AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेत देखील सोनं सुरक्षित नाही, समोर आलेल्या घटनेने देश हादरला, नेमकं काय घडलं?

जर तुम्ही देखील बँकेत सोनं ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण समोर आलेल्या एका घटनेने देश हादरला आहे.

बँकेत देखील सोनं सुरक्षित नाही, समोर आलेल्या घटनेने देश हादरला, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 16, 2026 | 10:49 AM
Share

Gold locker fraud:  बँकेत ठेवलेले सोनेही सुरक्षित नाही. कारण सध्या समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बेंगळुरूहून समोर आलेल्या धक्कादायक घटनेने बँकिंग सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने ग्राहकांचा विश्वासघात करत तब्बल 2780 ग्रॅम म्हणजेच सुमारे 2.7 किलो सोने लॉकरमधून काढून ते खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले आणि 3.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अधिकाऱ्याने ही रक्कम ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये उधळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गिरिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र कोट्यवधींच्या सोन्यापैकी मोठा हिस्सा अद्याप जप्त करायचा बाकी आहे.

कसा उघड झाला घोटाळा ?

5 फेब्रुवारी रोजी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता डेप्युटी मॅनेजरने लॉकरमधील सोने काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तूंवर हात घालणे हा त्यांच्या हक्कांचा सरळ उल्लंघन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्राथमिक तपासात आरोपीने मिळालेली रक्कम ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मवर वापरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात केवळ आर्थिक फसवणूक नाही तर विश्वासघात आणि गुन्हेगारी हेतूही स्पष्ट दिसून येतो आहे असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सुमारे 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांकडून ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन

खासगी फायनान्स कंपन्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित सोने सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. तपास अद्याप सुरू असून सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची आणि कागदपत्रांची नियमित तपासणी करावी. बँकेच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ अधिकाऱ्यांना कळवावे असे सांगण्यात आले आहे.

Follow Us
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया