AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor : चाहत्यांची प्रार्थना फळाला आली! शरद कपूर लवकरच करणार कमबॅक; म्हणाला, मी एका रॉकस्टारप्रमाणे…

Sharad Kapoor : अभिनेता शरद कपूर लवकरच इंडस्टीत कमबॅक करणार असून अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Sharad Kapoor : चाहत्यांची प्रार्थना फळाला आली! शरद कपूर लवकरच करणार कमबॅक; म्हणाला, मी एका रॉकस्टारप्रमाणे...
| Updated on: Nov 17, 2026 | 8:29 PM
Share

‘जोश’ चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेला अभिनेता शरद कपूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तो सध्या त्याच्या आयुष्यातील एका कठीण काळातून जात आहे. अभिनेता काही काळापासून आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक समस्यांना तोंड देत आहे. काही दिवसांपूर्वीच, त्यानं चित्रपटसृष्टीकडे काम मागण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर, सोनू सूद आणि सलमान खान यांनी त्याला पाठिंबा दिला. निर्माता शरद चौधरी यांनीही त्याला 3.5 लाख रुपयांचा चेक दिला.

शरद कपूरने शेअर केला व्हिडिओ

आता, शरद कपूरनं एक नवीन व्हिडिओ शेअर करून लोकांचे आभार मानले आहेत. त्यानं सांगितलं की तो पुढच्या वर्षी, म्हणजेच जानेवारी 2027 मध्ये कामावर परतण्यास तयार आहे. त्यानं चाहत्यांना प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आवाहनही केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘म्हणून, मी माझ्या चाहत्यांचे खूप खूप आभार मानू इच्छितो. देव तुम्हा सर्वांना नेहमी आनंदी ठेवो. हे प्रेम असंच टिकवून ठेवा, मी तुम्हा सर्वांना कधीही निराश करणार नाही. जानेवारीमध्ये मी एका रॉकस्टारप्रमाणे काम करायला सुरुवात करेन आणि तसाच राहीन.’

बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील शरद कपूरच्या मदतीसाठी पुढे आला आहे. त्यानं नुकतीच मुंबईतील वांद्रे येथे शरद कपूरची भेट घेऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासन दिलं. सोनूनं त्याच्या पायाच्या दुखापतीवर आणि इतर आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय साहित्य आणि डॉक्टरांची व्यवस्था करण्यास मदत केली आहे. इतकंच नाही, तर वृत्तानुसार, सोनूनं त्याला आपल्या आगामी चित्रपटात भूमिका देण्याचं वचनही दिलं आहे.

दरम्यान, शरद कपूर हा एक बॉलिवूड अभिनेता असून त्यानं हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘जोश’ चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. या चित्रपटात त्यानं प्रकाश शर्मा या खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘जोश’मधील अभिनयामुळे शरदला सर्वोत्कृष्ट खलनायकचा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. शरद कपूरनं 1994 मध्ये “मेरा प्यारा भारत” या चित्रपटाद्वारे करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो “दस्तक,” “त्रिशक्ति,” “जोश,” “हथियार,” “जानी दुश्मन: एक अनोखी कहानी,” “LOC: कारगिल,” “लक्ष्य” आणि “जय हो” सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

Follow Us
खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई
FDA : खजूर, दालचिनीपासून सुपारी अन् पेढ्यांपर्यंत, FDAची कारवाई; राज्यभरातून 1 कोटी 97 लाखांचा साठा जप्त
जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी; 21 पैकी 12 जागांवर उमेदवार बिनविरोध
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया