AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी गुड न्यूज… भारतासाठी होर्मुजचे दरवाजे उघडले, इराणची सर्वात मोठी घोषणा

जागतिक इंधनाच्या संकटात आणि अमेरिका-इराण तणावामुळे होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध आले होते. मात्र, इराणने भारतासह चीन, इराक आणि कतारसाठी होर्मुजचे दरवाजे खुले केले आहेत. ही भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी असून, अमेरिकेसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.

मोठी गुड न्यूज... भारतासाठी होर्मुजचे दरवाजे उघडले, इराणची सर्वात मोठी घोषणा
Hormuz StraitImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 5:49 PM
Share

India Iran Relations : इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगात तेलाचं संकट उभं राहिलं आहे. होर्मुज स्ट्रेट पश्चिम आशियातील युद्धाचा आखाडा झाला आहे. त्यामुळे होर्मुज स्ट्रेटमधून जाण्यास जगभरातील जहाजांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जगभरात इंधनाचं संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी मात्र एक गोड बातमी येऊन धडकली आहे. इराणने भारतासाठी होर्मुजचे दरवाजे उघडले आहेत. तशी घोषणाच इराणने केली आहे. भारतासाठी ही गुड न्यूज असली तरी अमेरिकेसाठी मात्र हा धक्का मानला जात आहे.

ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशीच भारताला तेहरानकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. इराणने भारत, चीन, इराक आणि कतारला या रणनीतीक सागरी मार्गातून जहाजांची ये जा करण्यास परवानगी दिली आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि सप्लाय चैनमध्ये आलेल्या अडथळ्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय व्यापारी जहाजांना होर्मुजमधून सुरक्षितपणे जाण्यासाठी रस्ता मिळाला आहे.

इराणी संसदेच्या नॅशनल सेक्युरिटी आणि फॉरेन पॉलिसी कमिटीचे व्हाइस चेअरमन अहमद हयात मोगद्दाम यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. भारत सहीत चार देशांचे जहाज या सागरी मार्गातून अडथळ्या विना ये-जा करू शकतात, असं त्यंनी म्हटलं आहे.

या देशांना मिळाली सूट

भारत

चीन

इराक

कतार

होर्मुज प्रकरणी आम्ही आधीच भारत, चीन, इराक आणि कतारला सुट दिली आहे. ते स्वतंत्र आहेत. म्हणजे आमच्या दृष्टीने ते स्वतंत्र आहेत. अमेरिकेलाही त्यांची काही अडचण नाहीये. ते होर्मुजमधून ये जा करू शकतात, असा दवा हयात मोगद्दाम यांनी केला आहे.

भारताला औषधांची आयात करता यावी या हेतूने ही सूट देण्यात आली आहे. तर चीनला राजनैतिक समर्थन मिळण्यासाठी आणि आर्थिक देवघेव करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. या देशांचे जहाज सातत्याने ये-जा करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

अमेरिकेचे हल्ले

दरम्यान, इराणच्या काही ठिकाणांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकेच्या ऐका सैन्य अधिकाऱ्याने दिली आहे. इराणच्या सरकारी मीडियाच्या मते, रणनैतिकतेने होर्मुजमध्ये केश्म आणि हेंगम बेट तसेत जवळचा मुख्य भूभाग बेट अब्बास परिसरात स्फोटाचे आवाज ऐकायला आले आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?