AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune civic polls : पूजा मोरे यांना संधी मिळायला हवी होती, मराठा समाजाची सहानुभूती

पूजा मोरे या आक्रमक आणि अभ्यासू असलेले नेतृत्व आहे आणि त्या कमी वयाच्या आहेत. म्हणून त्यांना पुणे महापालिकेच्या सभागृहात काम करण्याची संधी मिळायला पाहिजे होती. यामुळे वंचित शोषीतांचा आवाज म्हणून त्यांनी काम केले असते असे मराठा बांधवांनी म्हटले आहे.

Pune civic polls : पूजा मोरे यांना संधी मिळायला हवी होती, मराठा समाजाची सहानुभूती
puja more - jadhav
| Edited By: | Updated on: Jan 02, 2026 | 5:12 PM
Share

परळी, दि. 2  – परळीतील पूजा मोरे यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ट्रोल केल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज भाजपाने मागे घेतला. यानंतर मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पूजा मोरे यांना पाठींबा देत अशा प्रकारे ट्रोलिंग करणे बरोबर नाही. राजकारणात काम करताना जनतेच्या प्रश्नांवर टोकाची टीका करावी लागते. त्यांचा पूर्व इतिहास काढून जर त्यांच्या आधीच्या पक्षातील वक्तव्यांना उजाळा दिला जात असेल तर हे योग्य नाही असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मग आम्ही अनेकांचे आधीची वक्तव्ये काढू शकतो असा इशारा जरांगे पाटील यांनी काल नाशिक दौऱ्यावर असताना दिला होता. या संदर्भात पूजा मोरे यांच्या बाजूंनी मराठा समाजांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी आणि मराठा विरोधातील काही लोकांनी पूजा मोरे यांना ट्रोल केले, त्यामुळे त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. या संदर्भात कालच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परळीच्या पूजा मोरे यांना ट्रोल करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. आता मराठा समाजातील बांधवांनी पूजा मोरे यांच्या बाजूने आपली मते मांडली आहेत.

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी टीका करण्याआधी आपली लायकी बघावी त्यांना विधानसभेत केवळ 253 मतदान पडले होते, हे हाके विसरले आहेत.पूजा मोरे या पंचायत समिती सदस्य राहिलेल्या आहेत. पूजा मोरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना 2000 पेक्षा अधिक मतं पडले होती असेही या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचे मत आहे.लक्ष्मण हाके यांनी उंटाचा मुका घ्यायला जाऊ नये ते महागात पडेल, तुम्ही तुमची लायकी बघून काम करा, कोणाचे तरी पाकीट घेऊन नको तिथं तोंड घालू नका असाही सल्ला मराठी समाज बांधवानी दिला आहे.

पूजा मोरे यांनी पहेलगाम येथे सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी केलेले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने ट्रोल करून दाखवले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी बोललं तर आम्ही काय काय करतो, हे दाखवण्यासाठी हा अर्ज मागे घ्यायला लावला गेला.त्यामुळे आम्ही मराठा सेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा जाहीर निषेध करतो असेही मराठा कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा तमाशा केला गेला आहे. पूजा मोरे या पुरोगामी विचाराच्या होत्या, मात्र त्यांनी भाजपचे उमेदवारी मिळवली आणि त्यामुळेच मूळचे भाजपमधील काम करणारे दुखावले गेले असतील, त्याचाच परिणाम म्हणून त्यांना टोल करण्यात आल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे.

रडण्याऐवजी लढायला हवे होते

विचारांशी तडजोड करून पूजा मोरे- जाधव यांनी तिकीट मिळवले. भाजपची रणनीती खूप वेगळी आहे, त्यांच्यावर निष्ठावंतांनी विश्वास ठेवण्याची गरज नाही. काल परवा आलेल्या पूजा मोरेंना तिकीट दिलं हे त्यांना खटकणार आहे. धनंजय जाधव हे मराठ्यांचे पुढारी आहेत संभाजीराजे भोसले यांचे निकटवर्ती आहेत असे असताना त्यांनी रडण्याऐवजी त्याच वार्डामधील भाजपच्या गरसेवकाचा पराजय अपक्ष म्हणून उभे राहून करायला पाहिजे होता. भाजपची दहा लोक पाडण्याची ताकद धनंजय जाधव आणि ठेवली पाहिजे असा सल्ला मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?.
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ.
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.