Sanjay Raut | फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक करायचे आहे काय?; पोस्टरबाजीवरून संजय राऊतांनी झोडपले
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून होत आहे. मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात आज मुंबईतून होत आहे. मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबईत जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. “मॅक्रॉन यांना स्वीकृत नगरसेवक करायचं आहे का? हा सगळा वेड्यांचा बाजार आहे. या लोकांची वेड्यांची जत्रा भरली आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली. राऊत पुढे म्हणाले की, परदेशी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान किंवा नेते भारतात येतात आणि जातात, मात्र त्यात राजकीय पक्षांचा थेट संबंध काय?, असा सवाल उपस्थित केला. “फ्रान्समध्ये जेवढे पोस्टर लागले नसतील, तेवढे मुंबईत लागले आहेत. याआधी परदेशी पाहुणे मुंबईत आले नव्हते का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.
तसेच, “हा कार्यक्रम मॅक्रॉन यांच्यापेक्षा पंतप्रधानांचा शो अधिक दिसतो,” असा टोला लगावत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Published on: Feb 17, 2026 01:09 PM
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान

