AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद! संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद! संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

| Updated on: Feb 17, 2026 | 11:39 AM
Share

अजित पवारांचा अपघाती मृत्यू संशयास्पद असून, त्यांच्या मृत्यूची खासगी गुप्तहेर संस्थेकडून चौकशी होण्याची शक्यता आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे कुटुंबाचा सरकारी तपासावर विश्वास नाही. अमित शहांनी जरंडेश्र साखर कारखान्याची फाईल बंद करण्यास नकार दिल्याने अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केल्याचा राऊतांचा दावा आहे.

ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नक्कीच संशयास्पद असल्याचे त्यांचे मत आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात दोन प्रेझेंटेशन सादर केली असून, आणखी एक सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. माहितीनुसार, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी खासगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता आहे आणि ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित पवारांनी पाच दिवसांपूर्वीच ही शंका व्यक्त केली होती. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जर सरकारच्या तपासावर विश्वास नसेल, तर त्यांनी स्वतंत्र एजन्सीमार्फत माहिती काढण्याचा प्रयत्न करणे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे, असे राऊत म्हणाले. अजित पवारांच्या मृत्यूपूर्वी, ज्या फाईल्समुळे ते भाजपासोबत गेले होते, त्या पुन्हा उघडण्यात आल्या होत्या. यात जरंडेश्वर साखर कारखान्याच्या कर्जाचा विषय होता. ही फाईल बंद करण्यास केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी नकार दिला आणि ती पुन्हा महाराष्ट्रात पाठवली. यानंतर भाजपने अजित पवारांना तुमची फाईल बंद झालेली नाही, असे सांगितले. यामुळेच अजित पवारांनी भाजपसोबत राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार सुरू केला, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Published on: Feb 17, 2026 11:39 AM