PMC, PCMC, KMC Election Results 2026 LIVE : नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला पुणेकरांनी घरी बसवले; मुरलीधर मोहोळ बरसले
Pune Pimpri Chinchwad Kolhapur Ichalkaranji Solapur Sangli Election Results 2026 LIVE Counting in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागायला सुरूवात झाली आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सहा महापालिकांचा निकालही लागताना दिसत आहेत. पाच ते आठ वर्षानंतर या महापालिकांची निवडणूक झाली. त्याचे निकाल आज येत असून सर्वांना उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. खासकरून या महापालिकेत भाजपची कामगिरी कशी होते? याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकालाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट जाणून घ्या.

आज होईल उद्या होईल म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीकडे गेल्या पाच ते आठ वर्षापासून मतदारांचं लक्ष लागलं होतं. अखेर तो क्षण आला आहे. काल पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी मतदान झाल्यानंतर आज या सहाही महापालिकांचा निकाल लागणार आहे. राज्यात ज्या 29 महापालिकांचा आज निकाल लागणार आहे. त्यातील सर्वाधिक महापालिका या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या महापालिकांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सहापैकी पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि सांगली मिरज कुपवाड या चार महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या. तर कोल्हापूर महापालिका ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. इचलकरंजी महापालिका नव्याने निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व महापालिकांच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व कायम राखण्यात भाजप यशस्वी ठरतो की या ठिकाणी वेगळा निकाल लागतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पुणे महापालिकेसाठी 162, पिंपरी-चिंचवडसाठी 128, सोलापूरसाठी 113, सांगली-मिरज-कुपवाडसाठी 78, कोल्हापूरसाठी 92 आणि इचलकरंजीसाठी 76 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मतदारराजा आज कुणाला कौल देतो, हे काहीवेळात स्पष्ट होणार आहे. या सहाही महापालिकांचे सेकंदा सेकंदासाठीचे अपडेट खालीलप्रमाणे…
LIVE NEWS & UPDATES
-
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
पिंपरी चिंचवड महापालिकेचा निकाल आला आहे. या निकालात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस, ठाकहे गट, मनसे, शरद पवार गटाला खातंही खोलता आलं नाहीये.
पिंपरी चिंचवड महापालिका
एकूण जागा – 128
भाजप – 84
शिवसेना – 06
राष्ट्रवादी – 37
काँग्रेस – 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00
राष्ट्रवादी (शरद पवार) – 00
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00
अपक्ष -01
-
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
शिवसेनेचे चार नगरसेवक असले तरी शंभराला भारी पडतील. सोलापुरातील भाजपच्या विजयावर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांची प्रतिक्रिया
-
-
मुरलीधर मोहोळ निकाल येताच अजितदादांवर बरसले, पहिली प्रतिक्रिया काय?
पुणे महापालिकेत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपचे नेते मुरलधीर मोहळ यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नकारात्मक विचाराच्या लोकांना पुणेकरांनी घरी बसवले आहे, अशा शब्दात त्यांनी अजितदादांवर हल्ला चढवला आहे.
-
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये पक्षीय बलाबल 2026
भाजप – 39 सेना शिंदे गट – 2 काँग्रेस – 18 राष्ट्रवादी ( अजित पवार)- 16 राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) – 3
निवडून आलेले विजयी उमेदवार प्रभाग निहाय खालीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी) रवींद्र सदामते माया गडदे पद्मश्री पाटील चेतन सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 2
प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप) गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी) मालुसरे महावीर खोत (भाजप ) प्रकाश रमेश पाटील (भाजप)
प्रभाग क्रमांक 3 संदीप आवटी – भाजपा शिवसेनेचे सागर वनखंडे राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी
प्रभाग क्रमांक 4 निरंजन सुरेश आवटे भाजप मोहन दत्तात्रय वाटवे भाजप विद्या बाबासाहेब नलवडे भाजप अपर्णा विवेक मोटे भाजप
प्रभाग क्रमांक 5 शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अप बबिता मेंढे काँग्रेस संजय मेंढे काँग्रेस करण जामदार राष्ट्रवादी अप
प्रभाग क्रमांक 6 मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अप अजून काजी राष्ट्रवादी उप बिलकीश बुजरूक काँग्रेस मुब्बशिरीन बागवान काँग्रेस
प्रभाग क्रमांक 7 भाजपा गणेश माळी भाजपच्या बानु जमादार उज्वला कांबळे दयानंद खोत
प्रभाग क्रमांक 08 विष्णू माने राष्ट्रवादी अप दीपक वायदंडे भाजपा मीनाक्षी पाटील योगिता राठोड भाजपा
प्रभाग क्रमांक 9 भाजपा संतोष पाटील वर्षा सरगर रोहिणी पाटील अतुल माने
प्रभाग क्रमांक 10 जगन्नाथ ठोकळे भाजपा गीता पवार भाजपा वर्षा निंबाळकर काँग्रेस प्रकाश मुळके भाजपा
प्रभाग क्रमांक 11 हर्षवर्धन पाटील काँग्रेस अश्विनी कोळेकर काँग्रेस रमेश सरजे काँग्रेस अंजली जाधव काँग्रेस
प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी) लक्ष्मी सरगर रईसा शिकलगार संजय यमगर धीरज सूर्यवंशी
प्रभाग क्रमांक 13 मधून अभिजीत कोळी विजयी राष्ट्रवादी दिपाली दिलीप पाटील विजयी काँग्रेस अश्विनी चेतन कदम विजयी काँग्रेस
प्रभाग क्रमांक 14 युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट अनिता पवार भाजप मनीषा कुकडे भाजप उदय बेलवलकर भाजप
प्रभाग क्रमांक 15 काँग्रेस मंगेश चव्हाण फिरोज पठाण स्मिता यमगर सोनल पाटील सावर्डेकर
प्रभाग क्रमांक 16 स्वाती शिंदे भाजपा राजेश नाईक काँग्रेस सलमा शिकलगार काँग्रेस मयूर पाटील काँग्रेस
प्रभाग क्रमांक 17 दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप ) साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप) प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप) लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )
प्रभाग क्रमांक 18 अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप नसीमा नाईक राष्ट्रवादी अप वैशाली राजू गवळी भाजपा गाथा जगदाळे भाजपा
प्रभाग क्रमांक 19 युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप अलका ऐवळे भाजपा सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप कीर्ती देशमुख भाजपा
प्रभाग क्रमांक 20 अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अप अश्विनी कोळी राष्ट्रवादी अप
-
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांना खासदार उदयनराजे यांची गाडी दिसल्यानंतर गाड्यांचा ताफा थांबवत खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांनी मंत्री शंभूराजे देसाई यांना कडकडून मिठी मारली. यावेळी त्यांच्या राजकारण आणि इतर विषयांवर थोड्या गप्पा सुद्धा झाल्या. मात्र जाता जाता उदयनराजे यांनी कॉलेजचे दिवस किती मस्त होते, असं शंभूराजेंना म्हणाले. हा video सध्या खूप व्हायरल होत असून या भेटीची चर्चा चांगलीच रंगली आहे.
-
-
पुण्यात रवींद्र धंगेकरांना धक्का, पत्नी पराभूत
पुण्यात खासदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. त्या वॉर्ड क्रमांक 23 मधून लढवत होत्या. त्यांच्या विरोधात आंदेकर टोळीतील सोनाली आंदेकर या निवडणूक लढवत होत्या. सोनाली या तुरुंगातून लढत होत्या. प्रभाग 23मध्ये ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे.
-
हा विजय धन शक्तीचा नाहीत जन शक्तीचा आहे, शंकर जगताप यांचा हल्ला
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, मात्र लोकांनी आरोप प्रकल्पाला थारा न देता विकासाच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे आम्ही जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे. निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही या पुढे विकास कामातून उत्तर देणार अशी, प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर दिली आहे.
-
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
पुणे महापालिकेचा निकाल लागताच भाजपने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
-
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला – मुरलीधर मोहोळ
काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने मात्र आमच्यावरती विश्वास दाखवला. आम्हाला पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल पुणेकरांचे आभार असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.य ी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. यापूर्वीही आम्ही सातत्याने म्हणत होतो की आम्ही 120 जागेवरती विजयी होऊ, आम्हाला तो विश्वास होता. प्रचारादरम्यान आमच्यावरती टीका झाली मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोलत राहिलो. पुणेकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आनंद आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या जोमाने काम यांचं आहे असंही मोहोळ म्हणाले.
-
Pune Election Result : पुण्यातील बहुचर्चीत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 ची मत मोजणी थोड्यावेळात होणार सुरु
पुण्यातील बहुचर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 ची मत मोजणी थोड्यावेळात सुरु होणार आहे.
या प्रभागात अशी आहे लढत..
लहू बालवडकर भाजपा × अमोल बालवडकर राष्ट्रवादी
गणेश कळमकर भापपा × बाबुराव चांदेरे राष्ट्रवादी
मयुरी कोकाटे भाजपा × गायत्री मेढे,कोकाटे राष्ट्रवादी
रोहिणी चिमटे भाजपा × पर्वती निम्हण राष्ट्रवादी.
-
Pune Election Result 2026 : रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आघाडीवर की पिछाडीवर ?
पुणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या आघाडीवर आहेत.
-
Pune Election Result 2026 : भाजपा पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष….
पुणे भाजपा पक्ष कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहे. पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या शंभराहून अधिक जागा विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे विजय उमेदवार दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केला.
-
Solapur Election Result 2026 : सोलापूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवाराचा जल्लोष
सोलापूर मध्ये मतमोजणी केंद्राबाहेर विजयी उमेदवाराने जल्लोष केला. सोलापूर मध्ये प्रभाग क्रमांक 10, 11, 12 आणि 13 या चारही प्रभागांमध्ये भाजपाचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी झाले .
शहरातील कुचन प्रशाला मतमोजणी केंद्राबाहेर भाजपाच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
-
Pune Election Results 2026 : पुणे भाजपा पक्ष कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष….
पुणे भाजपा पक्ष कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष पहायला मिळत आहे. जनतेच्या विश्वासाचा हा विजय आहे. पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या शंभराहून अधिक जागा विजयी होतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे विजय उमेदवार दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केला.
-
Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूरमध्ये एमआयएमने उघडलं खातं
सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाने खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 4 मधून सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
-
अजितदादाच्या राष्ट्रवादीचा मतमोजणीवर बहिष्कार; रुपाली पाटील ठोंबरे यांचा भाजवर गंभीर आरोप
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील निकालाचे कल समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संताप पसरला आहे. या महापालिकांमध्ये राष्ट्रवादी पिछाडीवर गेला असून भाजपच्या हाती सत्ता आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी तर भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टीने हे सर्व घडवून आणलं आहे. आमचा या मतमोजणीवरती बहिष्कार आहे. भाजप सोडून सर्व उमेदवारांचा या मतमोजणीवर बहिष्कार आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.
-
सांगलीचा महानिकाल, भाजच्या हातीच महापालिका
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कल आणि निकाल हाती येत आहेत. कलानुसार महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. या महापालिकेत भाजपला सर्वाधिक 24 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे आणि मनसेला खातंही खोलता आलेलं नाही.
कुणाच्या किती जागा –
भाजप – 24
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी AP – 08
राष्ट्रवादी SP – 01
शिंदेची शिवसेना – 01
-
Sangli Mahapalika Election Results : सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत कोणाला किती मिळाल्या जागा ?
सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील 78 पैकी 42 जागांचा निकाला आला असून कोणत्या पक्षाला किती जागांवर विजय मिळाला ती आकडेवारी समोर आली आहे.
भाजप – 24
काँग्रेस – 08
राष्ट्रवादी AP – 08
राष्ट्रवादी SP – 01
शिंदेची शिवसेना – 01
शिवसेना UBT – 00
मनसे – 00
इतर – 00
-
Pune Mahapalika Election Results : राष्ट्रवादीच्या उमेदवार रुपाली ठोंबरे यांचा मतमोजणीवर आक्षेप
पुण्यात राष्ट्रवादी काँग्से अजित पवार गटाच्या उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. मशीन बदललं, नंबर मॅच होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडून हे अपेक्षित नाही, असं म्हणत त्यांनी आक्षेप घेतला आहे.
-
Sangli Election Results 2026 : कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाजप शहर जिल्हाध्यक्ष पराभूत
कुपवाडच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाजप शहर जिल्हाध्यक्षांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गजानन मगदूम विजयी झाले असून भाजप शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव केला
-
Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपच ठरतोय सरस, राष्ट्रवादीलाही मोठा फटका
पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोघेही एकत्र आले तरी फारसा करिश्मा दिसला नाही. पुण्यातील मतदारांनी काका-पुतण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजप 80 जागांवर आघाडीवर असून दोन्ही राष्ट्रवादींना मिळून अवघ्या 9 जागांवर आणि काँग्रेसला 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.
-
Solapur Election Results 2026 : सोलापूरमध्ये प्रभाग 24 चा निकाल समोर, कोण जिंकलं ?
सोलापूर प्रभाग 24 चा निकाल हाती आला असून तिथे मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी झालेत. मधुसूधन जंगम, वनिता पाटील, अश्विनी चव्हाण, नरेंद्र काळे यांना विजय मिळाला आहे.
-
Sangli Municipal Election Results 2026 : सांगली महापालिका प्रभाग 13 चा निकाल समोर
सांगली महापालिका निकाल समोर आला आहे.
सांगलीवाडी प्रभाग क्रमांक 13 मध्ये शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पॅनल विजयी.
प्रभाग क्रमांक 13 अ मधून शरद पवारांचे राष्ट्रवादीचे अभिजीत कोळी विजयी.
प्रभाग क्रमांक 13 ब मधून काँग्रेसचे दिपाली दिलीप पाटील विजयी.
आणि प्रभाग क्रमांक 13 क मधून अश्विनी चेतन कदम विजयी.
-
Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूर प्रभाग 11 चा निकाल समोर, भाजचे सर्व उमेदवार विजयी
सोलापूर प्रभाग 11 मध्ये भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे युवराज सरवदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी कडगंची, अजय पोन्नम यांना विजय मिळाला.
-
Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूर शिंदे गटाचे क्षीरसागर विजयी
कोल्हापूर शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा विजयी झाला आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 27 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 9, राष्ट्रवादी काँग्रेस 2, काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला तिथे भोपळाही फोडता आलेला नाही.
-
Sangli Election Results 2026 : सांगली महापालिका निकाल समोर
सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा निकाल समोर आला आहे.
भाजप – 13
शिंदेची शिवसेना – 01
राष्ट्रवादी AP – 04
शिवसेना UBT – 00
मनसे – 00
राष्ट्रवादी SP – 00
काँग्रेस – 06
इतर – 00
-
Pune Election Results 2026 : पुणे मनपा निवडणूक – प्रभाग क्रमांक 36 चा निकाल हाती
पुणे मनपा निवडणुकितील प्रभाग क्रमांक 36 चा निकाल हाती आला असून भाजपचे 4 ही उमेदवार विजयी झालेत. शैलजा भोसले,वीणा घोष,सई थोपटें, महेश वाबळे हे चौघे विजयी झाले आहेत.
-
Sangli Election Results 2026 : सांगली – महापालिका निवडणूक निकाल
सांगली – महापालिका निवडणूक विजयी निकाल
मिरज प्रभाग 3 मधून भाजपाचे संदीप आवटी विजयी
मिरज प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे संजय मेंढे व बबिता मेंढे पती-पत्नी विजयी
मिरज प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे करण जामदार विजयी
सांगली प्रभाग क्रमांक 15 मधून काँग्रेसचे मंगेश चव्हाण आणि काँग्रेसच्या सोनल पाटील-सावर्डेकर आणि फिरोज पठाण विजयी
सांगली प्रभाग क्रमांक 12 मधून धीरज सूर्यवंशी ,संजय यमगर विजयी
प्रभात क्रमांक एक मधून भाजपाचे रवींद्र सदामते विजयी
-
Ichalkaranji Election Results 2026 : इचलकरंजीमध्ये ठाकरेंनी उघडलं खातं
इचलकरंजी महानगरपालिकेत ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. प्रभाग 5 मधून शिवाजी पाटील यांचा विजय झाला आहे.
-
Pune Election Results 2026 : पुण्यात काँग्रेसने उघडलं खातं
पुणे महानगरपालिकेची मतमोजणी सुरू असून काँग्रेसने खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून साहिल केदारी हे विजयी झाली आहेत.
-
Sangli Municipal Election Results 2026 : भाजपचा उमेदवार विजयी
सांगली – प्रभाग 3 मधून भाजपाचे संदीप आवटी विजयी. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे संजय मेंढे व बबिता मेंढे पती-पत्नी विजयी झालेत, तर प्रभाग क्रमांक 5 मधून काँग्रेसचे करण जामदार विजयी झाले आहेत.
-
Pune Municipal Election Results 2026 : रुपालो ठोंबरे पाटील पिछाडीवर , भाजपा उमेदवार आघाडीवर
पुणे – प्रभाग 25 मध्ये दुसऱ्या फेरी अंती भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
स्वरदा बापट 13 हजार 900 मतांनी आघाडीवर तर बापू मानकर 15 हजार 505 मतांनी आघाडीवर आहेत.
स्वप्नाली पंडित 5374 मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर आहेत
-
Pune Municipal Election Results 2026 : पुण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांचा मतमोजणी केंद्रात गोंधळ
पुणे – न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावरती मतमोजणी थांबवली. ईव्हिएम मशीन बदलल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा मतमोजणी केंद्रात गोंधळ.
-
Pimpri Municipal Election Results 2026 : पिंपरीत विलास लांडे यांना धक्का
पिंपरीमध्ये प्रभाग 7 मधून विलास लांडे यांचे पुतणे पिछाडीवर असल्याचं समोर आलं आहे.
-
Mahapalika Election Results 2026 : सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत कोणाला किती जागांवर आघाडी ?
सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत कोणता पक्ष किती जागांवर आघाडीवर ?
भाजप – 06
शिवसेना – 01
राष्ट्रवादी – 04
शिवसेना UBT – 00
मनसे – 00
राष्ट्रवादी SP – 00
काँग्रेस – 07
इतर – 01 ( जनसुराज्य )
-
Pune Election Results 2026 : पुण्यात भाजपची मोठी मुसंडी, 44 जागांवर आघाडी
पुण्यात भाजपने मोठी मुसंडी मारली असून 44 जागांवर आघाडी घेतली आहे.तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 13 जागांवर अडकलेला दिसत आहे.
-
Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूरमध्ये शिंदेंचा काँग्रेसला धक्का, कोण विजयी ?
कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल समोर येत असून शिंदे गटाचे अजय इंगवले विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला आहे.
-
Pune Election Results 2026 : प्रभाग क्रमांक 25 मध्ये दुसऱ्या फेरीतही भाजपाची आघाडी कायम
पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम आहे. स्वरदा बापट, कुणाल टिळक, बापू मानकर आणि स्वप्नाली पंडित या चार ही जणांची आघाडी कायम आहे. मूळ पुणेकरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 25 मध्ये भाजप वर्चस्व राखण्याच्या तयारीत दिसत आहेत.
-
Sangli Election Results 2026 : सांगली महापालिकेचे निकाल समोर येण्यास सुरूवात, कोण आघाडीवर ?
सांगली – महापालिका निवडणूकीचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे.
प्रभाग 15 मध्ये काँग्रेसचे मंगेश चव्हाण आघाडीवर तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाच्या माया गडदे आघाडीवर आहेत.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे चेतन सूर्यवंशी आघाडीवर
प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजपाचे रवींद्र सदामते आघाडीवर
प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिरीना पिरजादे आघाडीवर
प्रभाग 5 मध्ये काँग्रेसचे संजय मेंढे आघाडीवर
प्रभाग 15 मध्ये काँग्रेस फिरोज पठाण आणि काँग्रेसच्या सोनल पाटील आघाडीवर
प्रभाग 9 मध्ये भाजपाचे संतोष पाटील, अतुल माने,रोहिणी पाटील आणि सरगर आघाडीवर आहेत.
-
Pune Election Results 2026 : पुण्यात ठाकरे सेनेच्या वसंत मोरे यांना धक्का
पुण्यात ठाकरे सेनेचे वसंत मोरे यांचे पुत्र पिछाडीवर आहेत. वसंत मोरे यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
-
Kolhapur Municipal Election Results 2026 : महापालिकेचा पहिला विजयी निकाल कोल्हापूरमधून
महापालिकेचा पहिला विजयी निकाल कोल्हापूरमधून आला आहे. कोल्हापूरमध्ये भाजपने आघाडी घेतली असून प्रभाग 3 मधून भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. राजानंद महाडिक, प्रमोद देसाई, वंदना मोहिते आणि विजय माने हे जिंकले आहेत.
-
Pune Municipal Election Results 2026 : पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप पिछाडीवर
पुण्यामध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप पिछाडीवर. नुकतेच काँग्रेसमध्ये गेलेले जगताप हे पिछाडीवर आहेत.
पुण्यात भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. भाजप 32 जागांवर आघआडीवर तर शिवसेना 2 , राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे.
-
Kolhapur Election Results 2026 : कोल्हापूर महानगरपालिकेत काय स्थिती ?
कोल्हापूर महानगरपालिकेची मतमोजणी सुरू झाली असून प्रभाग 9 मधून काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर आहेत. कोल्हापूरमध्ये भाजप 15 , शिवसेना 7, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 17 जागांवर तर शिवसेना ठाकरे गट 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
Pune Election Results 2026 : पुण्यात पहिल्या फेरीत कोण कोण आघाडीवर ?
पुणे – प्रभाग क्रमांक 25 मधील पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडीत, राघवेंद्र मानकर आघाडीवर आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या रुपाली पाटील ठोंबरे, तसेट सुनील खाटपे पिछाडीवर आहेत.
-
Pune Mahapalika Election Results : पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी मुसंडी
पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असून 32 जागांवर आघाडी घेतली आहे. पुण्यात राष्ट्रवादी 14, शिवसेना 2 , काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे.
-
Pimpri Chinchwad Mahapalika Election Results : पिंपरी चिंचवडमध्ये भाजप किती जागांवर आघाडीवर ?
पिंपरी चिंचवड महानगरापालिकेसाठी करण्यात आलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरू असून पिंपरी चिंचडवडमध्ये भाजप 5 तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहेत. अजित दादा कमाल करणार की भाजप त्यांची गाडी अडवणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Pune Election Results 2026 : पुण्यात पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर
पुणे महानगरपालिकेसाठी काल मतदान झालं. आज मतमोजणीला सुरूवात झाली असून पोस्टल मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे.
-
Pune Election Results 2026 : पुण्यात टपाली मतमोजणीला सुरुवात
पुणे महानगरपालिकेसाठी काल मतदान झालं. आता पुण्याती न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावरती प्रभाग क्रमांक 25 मधील टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
-
Pune Election Results 2026 : पुण्यातील मतमोजणीला सुरुवात
पुण्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून भवानी पेठ येथे प्रभाग क्रमांक 22,23,24 ची मतमोजणी होणार. प्रभाग क्रमांक 23 मध्ये सोनाली आंदेकर,लक्ष्मी आंदेकर, प्रतिभा धंगेकर हे उमेदवार आहेत.
-
Solapur Mahapalika Election Results : मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज, मतमोजणी केंद्राच्या टेबलवर कर्मचारी तैनात…
सोलापूर महानगरपालिकेसाठी मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी केंद्रावर प्रत्येक टेबलवर कर्मचारी तैनात असून त्यांना आवश्यक अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. आता केवळ दहा वाजता ईव्हीएम मशीन आणून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे.
-
Pune Mahapalika Election Results : मतमोजणी केंद्रावर प्रशासनाकडून जय्यत तयारी…
राज्यातील 29 नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेला दहापासून सुरुवात होईल. शहरात एकूण 15 मतमोजणी केंद्रावरती 41 प्रभागांची मतमोजणी केली जाणार आहे. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल मतमोजणी केंद्रावरती प्रभाग क्रमांक २५,२७ व २८ या प्रभागाची मतमोजणी होणार आहे.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सुन स्वरदा बापट तसेच दिवंगत आमदार मुक्त टिळक यांचा मुलगा कुणाल, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे , राष्ट्रवादीच्या रूपाली ठोंबरे यांचा निकाल या मतमोजणी केंद्रावरून स्पष्ट होणार आहेत.
-
Pune Election Results 2026 : निकाला आधीच भाजपच्या गणेश बिडकर यांचे महापौर साहेब अशा आशयाचे बॅनर
पुणे महापालिक निवडणुकीसाठी काल मतदान झालं. आज अद्याप मतमोजणीला सुरूवात व्हायची आहे, पण निकालाआधीच भारतीय जनता पार्टीच्या गणेश बिडकर यांचे पुण्यात महापौर साहेब अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
-
Ichalkaranji Election Results 2026 : इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात
इचलकरंजी महानगरपालिकेचे निवडणूक पार पडत असताना आज मत मोजणी दहा वाजता सुरुवात होणार आहे. राजीव गांधी भवन येथे ही मतमोजणी होणार आहे. 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात आहेत. काल सुमारे 70 टक्के मतदान झालं.
-
Pune Mahapalika Election Results : पुण्यात शिवसेना निर्णयाक ठरणार – रविंद्र धंगेकर
पुण्यात शिवसेना ही निर्णयाक ठरणार असं रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
अजित पवार गेम चेंजर आहेत. आम्हाला उमेदवारी देताना उशिर झाला. राजकीय डावपेच करता आले नाही. नाहीतर पुण्यात चांगले निर्णय घेता आला असता. युतीमुळे आम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागला, असंही त्यांनी नमूद केलं.
-
Pune Election Results 2026 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मतदारांसाठी आभारपत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांसाठी आभारपत्र लिहीलं आहे.
लोकशाहीचा हक्क बजावत उत्स्फूर्तपणे मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो असं अजित पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे.
मतदान केंद्रांवर सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दलही मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असं म्हणत अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले .
-
Pune Election Results 2026 : पुण्यात एकूण 52.42 टक्के मतदान
पुण्यात एकूण 52.42 टक्के मतदान झालं. 163 जागांसाठी 52 टक्के इतके मतदान झालं. एकूण 35 लाखापैकी 18 लाख 62 हजार 408 जणांनी मतदानाचा हक्क बजावला . मागच्या वेळी पेक्षा जवळपास 3.50 टक्के कमी मतदान झालं. 2017 साली 55.56 टक्के मतदान झाले होते. पुण्यात कमी मतदानाचा फटका नेमका कुणाला ? हे लवकरच कळेल.
-
Solapur Election Results 2026 : सोलापुरात निकालापूर्वीच आमदारपुत्र किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
निकालापूर्वीच सोलापुरात आमदारपुत्र किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मुलाचे बॅनर लागल्याने चर्चा सुरू आहे. ‘आम्ही भावी नाही पर्मनंट’ असा उल्लेख करत बॅनरबाजी करण्यात आली आहे. किरण देशमुख यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असाही बॅनरवर उल्लेख आहे. किरण देशमुख हे प्रभाग क्र. 2 मधून दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत
-
Municipal Election Results 2026 : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी किती झालं मतदान ?
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेसाठी काल मतदान झालं. या महापालिकांसाठी एकूण 61.3 टक्के मतदान झालं. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत केवळ 41.79 टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे दिसून आले.
2018 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 62.17 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटल्याने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
-
Pimpri Chinchwad Election 2026 : अजित पवारांच्या शहराध्यक्षांवर भाजपच्या महिला उमेदवाराचे आरोप, पालांडे-बहल वादाने राजकारण तापलं!
अजित पवारांच्या शहराध्यक्षांवर भाजपच्या महिला उमेदवाराचे आरोप, पालांडे-बहल वादाने राजकारण तापलं आहे. पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहराध्यक्षा आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार सुजाता पालांडे यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा उमेदवार योगेश बहल यांच्या समर्थकांनी घुसखोरी केली आणि घरातील सदस्यांना शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पालांडे यांनी केला आहे.
मला याची अजिबात कल्पना नाही. मी अशा गोष्टी करत नाही, असं म्हणत बहल यांनी हे आरोप फेटाळलेत.
मात्र या घटनेमुळे राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आहे.
-
Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026 : गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
पिंपरी चिंचवड – शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट’वार’! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पश्चात कुटुंबातील वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप,अर्थात दिर–वहिणींमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानापूर्वी अश्विनी जगताप यांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ अशी हेडिंग देत व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवलं. आमदार शंकर जगताप यांनी ‘नमकहरामी’ व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत वहिणनींनी सोशल मीडियावरून जहरी टीका केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
-
Pimpri Chinchwad Mahapalika Election Results : पिंपरी चिंचवडमध्ये काल एकूण किती टक्के मतदान?
पिंपरी चिंचवड – महापालिकेच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत अंदाजे 60 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
-
महापालिकांच्या मतदानानंतर थोड्या वेळात सुरू होणार मतमोजणी
Mahapalika Election Results : काल राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान झालं असून आता थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी झालेल्या मतदानाचे निकालही आज जाहीर होतील. या महापालिकांवर कोण विजयी पताका फडकावतो हे पाहणं महत्वाचं ठरेल
-
Mumbai Municipal Election Results 2026 : कोणाला मिळणार यश जोरदार तयारी…
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित होत्या. शेवटी निवडणूक आयोगाने निवडणुकांचे तारीख जाहीर केली. आज 29 महापालिकांचे निकाल लागणार आहेत.
Published On - Jan 16,2026 5:50 AM
