AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News Live : आदित्य ठाकरे कर्जतमध्ये सुरु असलेल्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात आक्रमक

| Updated on: Oct 26, 2026 | 9:17 AM
Share

Maharashtra News Live : शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील 'टोरंट पॉवर' (Torrent Power) कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीवर तीव्र आक्षेप घेतला असून आज ते त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहेत.

Maharashtra News Live : आदित्य ठाकरे कर्जतमध्ये सुरु असलेल्या बेसुमार वृक्षतोडी विरोधात आक्रमक

LIVE NEWS & UPDATES

  • 26 Oct 2026 09:30 AM (IST)

    रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली खंत

    कथित ऑडिओ किल्प संदर्भात आपल्या अनेक नेत्यांनी प्रखरतेने भूमिका मांडली नाही. ज्या पद्धतीने मी पक्षाची बाजू मांडली तशी कोणत्याही नेत्याने मांडली नाही. आपले कोण आणि त्यांचे कोण हे वेळीच ओळखलेले बरे रामदास कदम यांनी फोनवरून शिंदेंशी साधला संवाद, व्यक्त केली चिंता – सुत्र

  • 26 Oct 2026 09:20 AM (IST)

    आगीत जवळपास 2 एकर क्षेत्रवरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याच मोठं नुकसान

    जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा गावात चंद्रकांत परदेशी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रावरील जळून खाक झालाय, शेत शिवारातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ही आग लागली होती या आगीत या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं त्यामुळे ही आग नियंत्रणामध्ये न आल्याने चंद्रकांत परदेशी या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे…

  • 26 Oct 2026 09:04 AM (IST)

    जळगावच्या किनगाव येथील दगडफेकीच्या घटने प्रकरणी 50 ते 60 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

    18 ते 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे , यात महिलांचा देखील समावेश. किनगाव गावात दगडफेकीच्या घटनेनंतर आज जनजीवन सुरळीत..तणावपूर्ण शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. किनगाव मध्ये एस आर पी एफ, आरसीबी प्लातून सह स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे..

  • 26 Oct 2026 09:00 AM (IST)

    वृक्षतोडीवर संदीप देशपांडे आक्रमक

    ‘झाडखाऊ सरकारसाठी डिव्हिजनची भेट’, संदीप देशपांडे यांचं ट्विट, कर्जत तालुक्यातील टोरेंट जलविद्युत प्रकल्पावरून मनसे आक्रमक. टोरेंट जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्द्यावरून मनसेकडून सरकारवर निशाणा. कालच मनसे नेत्यांनी टोरेंट जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी दिली होती भेट. प्रकल्पस्थळी पाहणी केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

  • 26 Oct 2026 08:55 AM (IST)

    पीएमपीच्या ताफ्यात लवकरच अडीच हजार नवीन बस दाखल होणार

    पीएमपीच्या ताफ्यात लवकरच अडीच हजार नवीन बस दाखल होणार असल्याने करण्यात आलाय मास्टर प्लॅन…. पुण्यात पीएमपीएमएल प्रशासन पाच नवीन आगारांची निर्मिती करून सध्याच्या पाच आगारांचा करणार विकास आणि विस्तार….. पुण्यातील सुतारवाडी,कोथरूड,कोंढवा,मोहम्मदवाडी आणि बिबबेवाडी येथे बांधले जाणार नवीन आगार.  पाच नवीन आगार आणि डेपोची क्षमता वाढविणार असल्याने ई -बससाठी देखील पायाभूत सुविधा देण्यात येणार. आगामी काळात पीएमपीएलचा प्रवास वाढणार असल्याने पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय

  • 26 Oct 2026 08:50 AM (IST)

    उत्तर पुणे जिल्ह्यातील धरणातील पाण्याचे नियोजन कधी होणार ?

    उत्तर पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असताना, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा ठरणार आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत येणारे हुतात्मा बाबू गेनू डिंभे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मात्र, धरणातील पाण्याचे योग्य नियोजन आणि त्याचा प्रभावी वापर याकडे आता शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • 26 Oct 2026 08:45 AM (IST)

    धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाज पुन्हा आक्रमक

    धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाज पुन्हा आक्रमक. अहिल्यानगरमध्ये १ डिसेंबरला भव्य महामोर्चा. मोर्चा आणि मेळाव्यातून सरकारला देणार अल्टिमेटम. ८० वर्षांपासून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आंदोलकांचा आरोप. २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने भाजपविरोधात नाराजी. हक्काच्या संविधानिक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा. मराठवाड्यानंतर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात आंदोलन विस्तारण्याचा निर्धार

  • 26 Oct 2026 08:40 AM (IST)

    जालन्यात उसाला आग लागल्याची घटना

    जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा गावात चंद्रकांत परदेशी या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये जवळपास दोन एकर क्षेत्रावरील जळून खाक झालाय, शेत शिवारातून गेलेल्या विजेच्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ही आग लागली होती या आगीत या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं त्यामुळे ही आग नियंत्रणामध्ये न आल्याने चंद्रकांत परदेशी या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे…

  • 26 Oct 2026 08:35 AM (IST)

    परभणीत दोन गटात तुंबळ हाणामारी

    परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, एकमेकांना दांड्याने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करतांनाचा व्हिडिओ व्हायरल. हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती. घटनेत दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात करण्यात आलं दाखल. याप्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची पोलिसांची माहिती..

  • 26 Oct 2026 08:30 AM (IST)

    धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाज पुन्हा आक्रमक

    धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी समाज पुन्हा आक्रमक. अहिल्यानगरमध्ये १ डिसेंबरला भव्य महामोर्चा. मोर्चा आणि मेळाव्यातून सरकारला देणार अल्टिमेटम. ८० वर्षांपासून आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याचा आंदोलकांचा आरोप. २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने भाजपविरोधात नाराजी. हक्काच्या संविधानिक आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा. मराठवाड्यानंतर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात आंदोलन विस्तारण्याचा निर्धार

  • 26 Oct 2026 08:25 AM (IST)

    कल्याण पूर्व येथील धक्कादायक घटना

    कल्याण पूर्व येथील धक्कादायक घटना! पहाटे घरात आई-मुलगी आंघोळीसाठी गेल्या असताना परिसराची रेखी करत 23 वर्षे तरुणांकडून मोबाईलवर चित्रीकरण. प्रकार लक्षात येताच महिलेचा आरडाओरडा करत घातला गोंधळ. नागरिकांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात. महिलेच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल. चित्रीकरण कशासाठी? ब्लॅकमेलिंग किंवा पैशांची मागणी करण्याचा हेतू पोलिसांच चौकशी सुरू

  • 26 Oct 2026 08:20 AM (IST)

    गोंदियामध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार

    गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा गावासह 5 गावांमध्ये दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार…. हजारो महिलांनी काढली दारुबंदी करण्यासाठी रॅली….

  • 26 Oct 2026 08:15 AM (IST)

    सोलापूर DCC बँकेची निवडणूक अखेर जाहीर

    सोलापूर DCC बँकेची निवडणूक अखेर जाहीर झाली.  सोलापूर जिल्हा बँकेची निवडणूक मागील 8 वर्षांपासून रखडली होती.  26 ते 30 ऑक्टोबर पर्यंत बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. 3 नोव्हेंबरला पात्र अर्जांची यादी प्रदर्शित करण्यात येणार आहे.  3 ते 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.  18 नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार.  तर 26 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल तर 27 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  2018 ते 2026 पर्यंत जिल्हा बँकेवर प्रशासक असल्याने आता नव्याने निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच नेते तयारीला लागलेत.  सोलापूर जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

  • 26 Oct 2026 08:10 AM (IST)

    तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा पूर्ण; पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान!

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा पूर्ण झाल्यानंतर आज पहाटे देवीची मंचकावरून पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. विजयादशमीच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू होती. परंपरेनुसार श्रमनिद्रा पूर्ण झाल्यानंतर आज पहाटे धार्मिक विधी आणि पारंपरिक सोहळ्यात देवीला पुन्हा सिंहासनावर विराजमान करण्यात आले. त्यामुळे आता आई तुळजाभवानीचे दर्शन पुन्हा सिंहासनारूढ स्वरूपात भाविकांना घेता येणार आहे. आईच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजापुरात येणाऱ्या भाविकांसाठी हा श्रद्धेचा आणि भक्तिभावाचा महत्त्वपूर्ण क्षण आहे.

  • 26 Oct 2026 08:05 AM (IST)

    दिव्यात बेतवडे गावात धावत्या कारला अचानक आग

    दिव्यात बेतवडे गावात धावत्या कारला अचानक आग; वेळेवर पळ काढल्याने चालकासह प्रवासी सुखरूप, कार जळून खाक!. दिव्यातील बेतवडे गावातील गावदेवी मंदिर रोडवर रात्री आगीची घटना. चारचाकी कारला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ. चालकासह प्रवाशाने वेळीच कारमधून बाहेर पडल्याने दोघेही सुखरूप. अग्निशमन दलाचे एक रेस्क्यू आणि एक फायर वाहन घटनास्थळी दाखल होत आग आणली नियंत्रणात. मात्र ही आगीत की भीषण होती की काही क्षणातच कार पूर्णतः जळून खाक झाली

शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ‘टोरंट पॉवर’ (Torrent Power) कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पासाठी होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीवर तीव्र आक्षेप घेतला असून आज ते त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहेत. पुणे येथील MPSC आंदोलनातून प्रकाशझोतात आलेले आणि आपल्या कोल्हापुरी शैलीतील भाषणांमुळे प्रसिद्ध झालेले युवा नेते विवेकानंद पाटील यांनी या कर्जत-भीमाशंकर वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे. राजकीय आंदोलनानंतर भारत सोडून जाण्याबाबतच्या पोलीस नोटीसला आव्हान देणाऱ्या अभिनेता इम्रान खानच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय २६ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज सुनावणी घेणार आहे. या नोटीसमध्ये त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खानच्या वकिलाने दावा केला आहे की, त्याच्यावर कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही या याचिकेत पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत.

Published On - Oct 26,2026 8:29 AM

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन