AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde 500 Crore : महाराष्ट्रातील 500 कोटीचं प्रकरण, संजय राऊत यांची अमित शाहंकडे पत्र लिहून मोठी मागणी

Eknath Shinde 500 Crore : आता या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील 500 कोटींच्या कथित प्रकरणावरून संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र दिलं आहे.

Eknath Shinde 500 Crore : महाराष्ट्रातील 500 कोटीचं प्रकरण, संजय राऊत यांची अमित शाहंकडे पत्र लिहून मोठी मागणी
Amit Shah-Sanjay Raut
| Updated on: Oct 26, 2026 | 9:13 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण गाजत आहे. दसरा मेळाव्यात सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींचा गौप्यस्फोट केला होता. माझ्या नावाने एकनाथ शिंदे यांनी भाजपंकडून 500 कोटी रुपये घेतले असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्याच दिवशी दसरा मेळाव्यात या बद्दल एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अन्यथा मी पुरावे बाहेर काढील असं मनोज जरांगे पाटील बोलले होते. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी या सर्व ऑडिओ क्लिप महाराष्ट्राच्या जनतेला ऐकवल्या. त्यातून अनेक धक्कादायक, हादरवून सोडणाऱ्या बाबी समोर आल्या. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा आवाज होता. ते आंदोलन मॅनेज करण्याबद्दल बोलत होते. याचं ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटींचा सुद्धा उल्लेख होता.

आता या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील 500 कोटींच्या कथित प्रकरणावरून संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र दिलं आहे. भाजपने मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे दिल्याचा राऊत यांचा आरोप आहे. 500 कोटी रुपये कुठून आले आणि ते जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले का, असा सवाल विचारण्यात आला आहे. कथित आर्थिक व्यवहाराची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) तपासण्याची अमित शाहांकडे विनंती राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटलय?

“आदरणीय अमित शाहजी, महाराष्ट्रातील 500 कोटी रुपयांच्या प्रकरणाची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल. आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या. आता आंदोलनही विकत घेण्यास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये देण्यासाठी भाजपने श्रीकांत शिंदे यांच्याकडे पैसे दिल्याचा आरोप आहे. हा पैसा कुठून आला? आणि तो प्रत्यक्षात जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचला की नाही?. हे प्रकरण मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी (PMLA) संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) सोपवावा, अशी विनंती आहे” असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

Follow Us
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय