AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...

PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही…

| Updated on: Oct 25, 2026 | 6:43 PM
Share

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणादरम्यान एका युवकाने मोदी कुठेही जाणार नाहीत असे म्हणत गोंधळ घातला. यावर प्रतिक्रिया देताना खर्गेंनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत वादग्रस्त विधान केले. गोंधळ घालणाऱ्या युवकाला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचेही समोर आले आहे.

एका जाहीर सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. भाषणात एक युवक पंतप्रधान मोदी कुठेही जाणार नाहीत असे सातत्याने ओरडत होता, ज्यामुळे सभेत काही काळ तणाव निर्माण झाला. या युवकाच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत एक वादग्रस्त विधान केले.

मोदी का बाप भी जायेगा. बाप भी जायेगा. मोदी का बाप… मोदी का बाप भी जायेगा. चलो!” असे खर्गे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभेत गोंधळ घालणाऱ्या त्या युवकांनाकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचेही या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही संपूर्ण घटना महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आणखी भर घालणारी ठरली आहे. या घटनेमुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Published on: Oct 25, 2026 06:43 PM

Follow Us