AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmanpreet Kaur: मी अस्वथ होते…शतकी खेळीनंतर कॅप्टन्सीबद्दल प्रश्न विचारला असता हरमनप्रीत कौर असं काय म्हणाली?

Harmanpreet Kaur On Team India: हरमनप्रीत कौरने काल शतकी खेळी खेळली. यानंतर तिला सामनावीर पुरस्कार मिळाला. या पुरस्कारानंतर हरमनप्रीत कौर काय म्हणाली ते पाहा...

Harmanpreet Kaur: मी अस्वथ होते...शतकी खेळीनंतर कॅप्टन्सीबद्दल प्रश्न विचारला असता हरमनप्रीत कौर असं काय म्हणाली?
| Updated on: Oct 26, 2026 | 9:18 AM
Share

Harmanpreet Kaur IND W vs ZIM W: वडोदरा येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने झिम्बाब्वेला १२१ धावांनी पराभूत करून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली भारताने आपली पहिली एकदिवसीय मालिका जिंकली. हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी शतके झळकावली.

रविवारी, भारतीय कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या, परंतु हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांनी १२४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. १४८ धावांवर चौथी विकेट पडल्यानंतर, हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी १५३ धावा जोडून भारताला ३०० धावांच्या पुढे नेले. भारताने झिम्बाब्वेसमोर ३२९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी शतके झळकावली. भारताने पहिला एकदिवसीय सामना ९ गडी राखून जिंकला आणि हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडल्यानंतर आपले पहिले शतक झळकावले.

हरमनप्रीत कौर म्हणाली, “मला फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. मी तेच केले आहे आणि मला तेच पुढेही करायचे आहे. (ऑफ साइडला मारलेल्या तिच्या फटक्यांबद्दल) आज आम्ही एकदिवसीय सामना खेळत होतो आणि अशा परिस्थितीत तुम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळावे लागते. चांगल्या चेंडू खेळण्याबद्दल  आणि खराब चेंडू न सोडण्याबद्दल मी आणि प्रतिकाने चर्चा केली. मला वास्तविक जीवनाच्या जवळ राहायला आवडते. हेच सध्याचे वास्तव आहे आणि मला ते स्वीकारायचे आहे. क्रिकेट मला आनंद देते आणि मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत फलंदाजीचा पुरेपूर आनंद घेतला आहे. मला फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. (कॅप्टन्सीची खूप आठवण येते का?) जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता, तेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही. तुम्ही एक फलंदाज म्हणून खेळता, तुम्हाला जबाबदारी घ्यायची असते आणि परिस्थितीनुसार फलंदाजी करायची असते. परिस्थिती कोणतीही असो, मला माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. काल रात्री मला थोडा ताप होता, त्यामुळे जेव्हा आम्ही मैदानावर परत आलो तेव्हा मला थोडे अस्वस्थ वाटत होते. मला थोडी विश्रांती घ्यायची होती आणि पेनकिलर घेतल्यामुळे मला खूप आराम मिळत आहे.”

Follow Us
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....
कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही..
Bhimashankar Tree Cutting : कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरे आक्रमक; आदित्य ठाकरेही आज करणार पाहणी
इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
Ichalkaranji Bus : इचलकरंजीत कमी दरात PME बस सेवा सुरु; नागरिकांना मोठा दिलासा
गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? चर्चांना उधाण
Gokul Election | गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देणार? कोल्हापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या....
Mallikarjun Kharge : खरगेंच्या त्या वक्तव्याने भाजप आक्रमक; मोदींच्या वडिलांबाबतच्या टिप्पणीवर देशभरात आंदोलनं
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती