AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने

Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने

| Updated on: Oct 26, 2026 | 11:56 AM
Share

मुंबईसाठी महत्त्वाची बातमी. मध्य रेल्वेवर कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडल्याने तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या फास्ट ट्रॅकवरील लोकल सेवा विस्कळीत झाली असून, साधारण अर्धा ते पाऊण तास उशिरानं वाहतूक सुरू आहे. प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक व्यवस्था आज विस्कळीत झाली आहे. कांजूरमार्ग स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे रेल्वे सेवांवर परिणाम झाला असून, प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे येणाऱ्या फास्ट ट्रॅकवरील लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कामावर जाणाऱ्या आणि येणाऱ्या चाकरमान्यांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेवर साधारण अर्धा ते पाऊण तास उशिरानं वाहतूक सुरू आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हा बिघाड लवकरात लवकर दूर करून रेल्वे सेवा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून मुंबईकरांना वेळेत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता येईल.

Published on: Oct 26, 2026 11:56 AM

Follow Us