AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप

Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप

| Updated on: Oct 26, 2026 | 1:09 PM
Share

शहरी भागातील वाहतूक कोंडी, बेशिस्त नियोजन आणि वाढत्या समस्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांवर ताण येण्याऐवजी नागरिकांनी आणि प्रशासनाने शिस्त पाळावी असे ते म्हणाले. "सात पूर्णांक आठ टक्के जीडीपी झाला, त्याचा चाटायचा का?" अशा शब्दात त्यांनी विकासाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये वाढलेली वाहतूक कोंडी, बेशिस्त नियोजन आणि पायाभूत सुविधांचा अभाव यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये सकाळी लोक घरातून बाहेर पडल्यास गाडीतच अडकून पडतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दुचाकी, टेम्पो आणि ट्रेलर्सची वाढती संख्या, पण त्या तुलनेत रस्त्यांची कमतरता यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या सगळ्या परिस्थितीचा ताण पोलिसांवर येतो, पण नागरिक आणि प्रशासन म्हणून आपण कोणतीही शिस्त पाळत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याऐवजी ती खराब केली जात असल्याचेही ते म्हणाले. नवी मुंबईसारख्या शहरात रेल्वे व्यवस्था कोलमडल्यास नागरिक गाड्यांमध्ये अडकून पडतील, असे ते म्हणाले. शहरांना कोणताही आकार राहिलेला नाही. फुटपाथवर चालता येत नाही, बागा नाहीत, मैदाने नाहीत. या परिस्थितीत “सात पूर्णांक आठ टक्के आमचा जीडीपी झालाय, याचा चाटायचा तो” अशा खरमरीत शब्दांत त्यांनी सरकारला सवाल केला.

 

Published on: Oct 26, 2026 01:09 PM

Follow Us