AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana : ‘रामायण’ मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका ऑफर होताच कशी होती रिॲक्शन ? रणबीरने KBCमध्ये केला मोठा खुलासा

Ramayana : अभिनेता रणबीर कपूर लौकरच 'रामायण' चित्रपटात श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच दरम्यान तो 'कौन बनेगा करोडपती' या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता.

Ramayana : ‘रामायण’ मध्ये प्रभू श्रीरामांची भूमिका ऑफर होताच कशी होती रिॲक्शन ? रणबीरने KBCमध्ये केला मोठा खुलासा
| Updated on: Oct 26, 2026 | 2:35 PM
Share

Ramayana: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या बहुचर्चित, मोस्ट अवेटेड ‘रामायण’ या फिल्ममुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तो सातत्याने या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकताच रणबीर हा फिल्मच्या प्रमोशनसाठी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपति’ या क्विझ शोमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत अभिनेत्री साई पल्लवी आणि रवी दुबे हे दोघेही होते. त्या तिघांनी अमिताभ यांच्याशी वेगवेगळ्या विषायंवर गप्पा मारल्या. चित्रपटांत श्रीरामांची भूमिका साकारण्याबद्दल जी भीती वाटली, त्याबद्दलही रणबीर यावेळी बोलला.

तुम्हाला प्रभू श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मणाची भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली, तेव्हा मनात सर्वप्रथम काय विचार आला ? असं शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी तिघांनाही विचारलं. त्यावर रणबीर कपूरने सांगितलं की, सुरूवातीला मला भीती वाटली होती, मात्र काही काळानंतर हीच भीती कृतज्ञतेमध्ये बदलली.

काय म्हणाला रणबीर कपूर?

‘कौन बनेगा करोडपती’ च्या मेकर्सनी आगामी एपिसोडचा एक प्रोमो जाहीर केला आहे. त्यामध्ये रणबीर कपूर हा त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना दिसला. तो म्हणाला, “ जेव्हा मला हा रोल ऑफर झाला, तेव्हाच मला हे समजलं होतं की फक्त एक भूमिका नाही, तर खूप मोठी जबाबदारी आहे.  सुरुवातीला मला या भूमिकेची प्रचंड भीती वाटली, कारण करोडो लोकांची आस्था जोडलेली आहे.  ही भूमिका निभावण्यास मी सक्षम आहे का असा विचार केला. मी हे योग्य पद्धतीने साकारू शकेन का ? असाही प्रश्न माझ्या डोक्यात आला होता. ( कारण) कोट्यवधी लोकांची आस्था श्रीरामांशी जोडलेली आहे, निगडीत आहे. मात्र माझ्या भीतीचं लौकरच कृतज्ञतेमध्ये रुपांतर झालं” असं रणबीरने नमूद केलं.

चांगला माणूस बनण्याची संधी

मी नुकताच पिता झालो होतो, तेव्हा मला ही भूमिका ऑफर झाली. त्यामुळे ही संधी माझ्यासाठी आणखीनच खास होती, असं रणबीरने सांगितलं. “ जीवनाच्या या टप्प्यावर मला ही संधी मिळाली आणि आणखी चांगला माणूस बनण्याची संधी समोर होती. त्याचवेळी मी बाबा झालो होतो.  मला असं वाटतं की हा चित्रपट म्हणजे, देवाकडून मिळालेली एक भेट आहे. यामुळे मला चांगला माणूस बनण्याची, रामायण सविस्तरपणे समजण्याची आणि इतक्या उत्तम लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली” असं त्याने सांगितलं. “ प्रभू श्रीरामांप्रमाणे बनण हे काही सोपं काम नाही, पण ( यानिमित्ताने) काही शिकता आलं, आचरणात आणता आलं तर तीही एक मोठी गोष्ट ठरेल ” असं रबणीर पुढे म्हणाला.

दोन भागांत रिलीज होणार ‘रामायण’

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे या तिघांव्यतिरिक्त ‘रामायण’ चित्रपटात अभिनेता यश हा रावण बनला आहे, तर सनी देओल हनुमान आणि रकुल प्रीत सिंह शूर्पणखाच्या भूमिकेत दिसेल. हाँ चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 ला रिलीज होणार असून तो पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल