सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026
सांगली-मिरज-कुपवाड या महापालिकेसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. एकूण 20 प्रभाग आणि 78 वॉर्डसाठी निवडणूक होईल. अनुसूचित जातीसाठी 11 जागा राखीव आहेत. 6 जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव, तर ओबीसींसाठी 21 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाच्या वाट्याला 45 जागा आल्या आहेत. त्यातील 22 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. या महापालिका निवडणुकीसाठी 4 लाख 54 हजार मतदार आहेत. काही प्रभागांमध्ये लोकसंख्या घटली तर काही प्रभागत ती अधिक वाढली आहेत.
महायुतीचं टेन्शन वाढलं! संभाजी भिडे यांचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात, भाजपा-शिंदे गटाला भरली धडकी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता संभाजी भिडे यांचे धारकरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 29, 2025
- 5:17 pm