उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, या मोठ्या महापालिकेत भोपळाही फोडता आला नाही, भाजप सुसाट
महापालिका निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे, राज्यात भाजपला मोठं यश मिळालं आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित कामगिरी करताना आलेली नाहीये, काही महापालिकेत तर अजून खांतही उघडता आलेलं नाहीये.

राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या माहापालिकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळताना दिसून येत आहे. मुंबईमध्ये भाजपनं शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरा देत भाजपनं स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू केली आहे. पुण्यात भाजपचे उमेदवार 105 जागांवर आघाडीवर आहेत. तर मुंबईमध्ये 99 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दरम्यान सांगलीमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. या महापालिकेत एकूण 78 जागा आहेत त्यापैकी 33 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील सांगलीमध्ये चांगलं यश मिळालं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 13 उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. मोठी बातमी म्हणजे या महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला आपलं खातं देखील उघडता आलेलं नाहीये.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
दरम्यान पुण्यामध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, पुण्यात जरी भाजपविरूद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना रंगला असला तरी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या कामगिरीकडे देखील लक्ष होतं. पुण्यात भाजपनं स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. पुण्यात भाजपचे 105 उमेदवार आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार 12 जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला एक जागा मिळाली आहे. या महापालिकेत देखील शिवसेना ठाकरे गटाला भोपळाही फोडता आलेला नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपला चांगलं यश मिळालं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपनं दोन्ही राष्ट्रवादींना मोठा धक्का दिला आहे.
