AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभर मद्य पिणे बंद केल्यास लिव्हरमध्ये कोणते बदल होतात ? जाणून घ्या

अल्कोहोल आणि यकृताचे आरोग्य यांचा परस्पर संबंध असतो. जर समजा एखाद्याने महिनाभर अल्कोहोल पिणे बंद केले तर त्याच्या यकृतात नेमके कोणते बदल होतात?त्याचे यकृत म्हणजे लिव्हर चांगले कार्य करु लागते का ? हे जाणून घ्या.

| Updated on: Mar 03, 2026 | 11:50 PM
Share
जेव्हा तुम्ही मद्य पिता त्यावेळी तुमचे यकृत म्हणजे लिव्हरला ते पचवण्यासाठी खूप जास्त काम करावे लागते. रोज दारु पिल्याने यकृताच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. तेथे चरबी जमून जळजळ निर्माण होऊ शकते. मात्र, जर तुम्ही मद्य पिणे थांबवले तर यकृतात आपोआप रिकव्हर होण्याची आणि पुन्हा तयार होण्याची क्षमता असते.

1 / 6
 केवळ एक महिना दारुपासून दूर राहिल्याने देखील शरीरावर सकारात्मक बदल जाणवतात. यकृताच्या कार्यात सुधारणा होत जाते. यकृतातील चरबीचे प्रमाण कमी होते. हेल्थलाईन वेबसाईटच्या मते या सुधारणेचे प्रमाण व्यक्तीने किती काळ आणि किती मद्याचे सेवन केले आणि यकृताचे नेमके किती नुकसान झाले यावर अवलंबून असते.

2 / 6
जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्यामुळे यकृताच्या पेशीत चरबी जमा होते. त्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार होऊ शकतो. वेळेत मद्यपान बंद केले यकृताला अल्कोहोल पचवण्याची प्राथमिकता राहात नाही. त्यामुळे चरबी चयापचय प्रक्रिया सामान्य होण्यास सुरु होते आणि चरबी जमा होणे हळूहळू कमी होते. सौम्य फॅटी लिव्हर असलेल्या लोकांना एका महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसू शकते. मात्र, जे लोक वर्षानुवर्षे मद्यसेवन करत आहे त्यांना बरे होण्यास उपचारांची गरज लागू शकते.

3 / 6
यकृतात एंजाईम हे यकृताच्या पेशींमध्ये आढळणारे प्रथिन असते. जेव्हा यकृताच्या पेशी खराब होतात किंवा सूजतात तेव्हा हे एंजाईल रक्तात येतात. ब्लड टेस्टमध्ये त्यांची पातळी वाढलेली दिसते. नियमित मद्य पिणाऱ्याचे प्रमाण जास्त असते. महिनाभर पिणे बंद केले  तर यकृतातील एंजाईमची पातळी कमी होऊ शकते. मात्र, यकृत आधीच खूपच खराब झाले असेल तर उदा. सिरोसिसमध्ये एंजाईमची पातळी लवकर सामान्य होत नाही.

4 / 6
यकृत केवळ अल्कोहोलवर प्रक्रिया करते असे नव्हे तर रक्तातील साखर आणि रक्तालीत चरबी नियंत्रित करण्यात देखील महत्वाचा रोल बजावते. नियमित दारु घेतल्याने चयापचय विकार होऊ शकते. ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता आणि ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते. बीएमजे ओपन जर्नलमध्ये आलेल्या अभ्यासानुसार ज्या लोकांनी महिनाभर दारु बंद केली,त्यांच्यात इन्सुलिन संवेदनशीलता सुधारली आणि रक्तातील साखरेची पातळी देखील कमी झाली आणि लिपिड प्रोफाईल देखील सुधारले.

5 / 6
अनेकांना दारु सोडल्यानंतर लागलीच शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागता.  झोप नीट लागते. कमी थकवा जाणवतो आणि एकाग्रता वाढते. मात्र,जास्त मद्यपान करणाऱ्यांना मात्र अचानक दारु सोडली तर त्यांचे हात थरथरणे, चिंता आणि हृदयाचे ठोके वाढणे सारखी लक्षणे जाणवतात अशा स्थितीत वैद्यकील देखरेखीखाली दारु सोडण्याचा सल्ला दिला जात असतो.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...