AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalit Prabhakar: ललित प्रभाकरचं खरं आडनाव वेगळंच; तुम्हाला माहीत आहे का अभिनेत्याचं पूर्ण नाव?

Lalit Prabhakar: मराठमोठा अभिनेता ललित प्रभाकरचा मोठा चाहतावर्ग आहे. पण ललितचं खरं आडनाव तुम्हाला माहित आहे का? प्रभाकर हे खरंतर त्याच्या वडिलांचं नाव आहे.

| Updated on: Oct 21, 2026 | 3:14 PM
Share
Lalit Prabhakar: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर याने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. छोट्या पडद्यापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आता मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचला आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या ललितच्या अभिनयाचे आजही चाहते आहेत.

1 / 7
मात्र, तुम्हाला माहिती आहे का, ललित प्रभाकर हे त्याचं पूर्ण नाव नाही? त्याच्या नावामागे एक वेगळीच गोष्ट आहे. अभिनेत्याचं खरं आडनाव काय आणि तो ‘प्रभाकर’ हे नाव का लावतो, जाणून घेऊया.

2 / 7
अभिनेता ललित प्रभाकर याचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे असं आहे. अनेकांना त्याच्या नावातील ‘प्रभाकर’ हे आडनाव असल्याचं वाटतं. मात्र, प्रभाकर हे त्याच्या वडिलांचं नाव असून भदाणे हे त्याचं आडनाव आहे.

3 / 7
चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून ललितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्या नावाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याविषयी चाहत्यांना उत्सुकता असते.

4 / 7
ललित प्रभाकरला खरी लोकप्रियता झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्याने आदित्य देसाई ही भूमिका साकारली होती. अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली. मालिकेतील त्याचा सहज अभिनय आणि व्यक्तिमत्त्वामुळे तो तरुण प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला.

5 / 7
मालिकांमध्ये काम करत असतानाच ललितने चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला. ‘चि व चि सौ का’, ‘हंपी’, ‘आनंदी गोपाळ’ आणि ‘मीडियम स्पाइसी’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने विविध भूमिका साकारल्या. विशेषतः ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं आणि त्याच्या कारकिर्दीला महत्त्वाचं वळण मिळालं.

6 / 7
ललित प्रभाकरने केवळ मराठी चित्रपट आणि मालिकांपुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याचा त्याचा प्रयत्न कायम राहिला आहे. अलीकडे ‘प्रहार’ या चित्रपटातील अजमल कसाबच्या भूमिकेमुळेही तो चर्चेत आला आहे.

7 / 7
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात