AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....

Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले….

| Updated on: Oct 21, 2026 | 11:08 AM
Share

संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या नावावर ५०० कोटी घेतल्याचा गंभीर आरोप करत ईडी चौकशीची मागणी केली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना लॉरेन्स बिष्णोई गँगचा मुख्या म्हंटले, तसेच हरदीप पुरी यांच्या एपस्टीन प्रकरणावरून रेजिम चेंजचे भाकीत केले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावावर ५०० कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे पाटील यांनी स्वतः हा दावा केल्याचे राऊत यांनी नमूद केले. या प्रकरणात तात्काळ ईडीने मनी लाँडरिंगचा तपास करावा आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीसाठी समन्स बजावावे, अशी मागणी राऊत यांनी केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत त्वरित गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडे तपास सोपवावा, असेही ते म्हणाले.

राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. शहा हेच देशातील माफिया टोळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या छत्राखाली आणण्याचे काम करत असून, ते ‘लॉरेन्स बिष्णोई’ गँगचे मुख्या आहेत, असा दावा राऊत यांनी केला. साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला इतर राज्यांच्या पोलिसांच्या ताब्यात का दिले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या आरोपांमुळे राज्यातील आणि देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

Published on: Oct 21, 2026 11:08 AM

Follow Us