77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1

20 ऑक्टोबर  2026

Created By:  Soneshwar Patil

भारतीय दुचाकी बाजारपेठेत कमी किंमत, उत्तम मायलेज आणि कमी देखभाल खर्च असलेल्या बाइक्सना मोठी मागणी आहे.

विशेषतः नोकरदार वर्ग आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी या बाइक्स रोजच्या प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरतात.

सप्टेंबर महिन्यातही या सेगमेंटमधील बाइक्सची जोरदार विक्री झाली. हीरो स्प्लेंडरने पुन्हा एकदा विक्रीत अव्वल स्थान पटकावले.

सप्टेंबरमध्ये 4.31 लाख बाइकची विक्री झाली. या आकडेवारीवरून ग्राहकांमध्ये स्प्लेंडरची लोकप्रियता कायम असल्याचे दिसते.

रोजच्या वापरासाठी परवडणारी बाइक शोधणाऱ्या ग्राहकांकडून या मॉडेलला पसंती मिळत आहे. 77 हजार बाईकची एक्स-शोरूम किंमत आहे.