Rohit Pawar |अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; काय घडतंय?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना नरेश अरोराचा कॉन्ट्रॅक्ट नको असल्याचा दावा केला आहे. हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकही झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांना नरेश अरोराचा कॉन्ट्रॅक्ट नको असल्याचा दावा केला आहे. हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकही झाली होती. या बैठकीत एक नेता प्रत्यक्ष उपस्थित होता, तर दुसरा फोनवर होता, असं रोहित पवार म्हणाले. तसेच, त्या पॉलिटिकल कन्सल्टंटने दोन प्लेन खरेदी केले होते आणि सहा ते सात महिन्यांपूर्वीच ‘हॉकर्स’ नावाचं प्लेन खरेदी करण्यात आलं होतं, असं देखील रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. रोहित पवारांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण हे नवीन वळण घेण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 12, 2026 04:36 PM
Follow Us
Latest Videos

