AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र माझ्या हाती सत्ता कधी देतो… राज ठाकरे यांचं मोठं विधान

राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील वाहतूक मेळाव्यात महाराष्ट्रातील वाहतूक समस्या, निकृष्ट शहरी नियोजन आणि बेशिस्त यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. "महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय?" असे म्हणत त्यांनी सत्ता मिळाल्यास शिस्तबद्ध राज्य उभारण्याचा विश्वास व्यक्त केला. ई-चलानचा गैरवापर आणि रस्त्यांच्या दुर्दशेवरही त्यांनी चिंता प्रकट केली.

महाराष्ट्र माझ्या हाती सत्ता कधी देतो... राज ठाकरे यांचं मोठं विधान
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 1:05 PM
Share

आपल्या देशात वाहतुकीची समस्या अत्यंत वाईट आहे. कुणाचा कशाशी पायपोस नाही. रस्त्याने धड चालताही येत नाही. आपल्या शहरांना आकार नाही. आपल्याकडे बागा नाहीत. आपल्याकडे शिस्त नाही. आणि सांगणार जीडीपी वाढला. काय चाटायचा का? आपले तलाव बुजवले जात आहेत. तिकडे वस्त्या उभ्या राहतात, त्यांना टँकरने पाणी दिलं जातं, असा संताप व्यक्त करतानाच महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय, त्याची मी वाट बघतोय. खरंच वाट बघतोय. अशा प्रकारची शिस्त लावणे हे काही रॉकेट सायन्स नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

नवी मुंबईत मनसेच्या वाहतूक मेळाव्याला संबंधित करताना राज ठाकरे यांनी हे विधान केलं. यावेळी राज ठाकरे यांनी वाहतूकदारांच्या समस्यांनाही हात घातला. मी आता काही आपल्या वाहतूकदार बांधवांशी बोललो. त्यांचे प्रश्न समजून घेतले. वाहतूकदारांशी चर्चा केली. त्यातील एक प्रश्न वाहतुकीशी होता. मी अनेकदा भाषणात हा विषय काढला आहे. आता ईचलानचा विषय काढला. ईचलानला विरोध नाही. पण ज्या प्रकारे ईचलान लावले जातात त्या गोष्टी तपासल्या पाहिजे. ईचलान कॅमेऱ्यावर आले पाहिजे. कोणी तरी व्यक्तीश: जातो आणि ईचलान फाडतो, असं होता कामा नये, असं राज ठाकरे म्हणाले.

कामे निघावीत म्हणून रस्ते…

आज देशातील वाहतुकीचा प्रश्न इतका गंभीर आहे, त्यावर मी अनेकदा बोललो आहे. ही समस्या पुढे अक्राळविक्राळ होणार आहे. आताही झालेली आहे. कोणत्याही गोष्टीची बंधनं नाहीत, ही समस्या सोडवण्यासाठी चौकट आपल्याकडे घातली गेली नाही. एक लेखक म्हणाला होता, तुमच्या देशातील लहान मुलं कोणत्या प्रकारची गाणी गातात ते सांगा. मी तुमच्या देशाचं भवितव्य सांगतो. आपल्या देशातील लोकं बिडी जलायले म्हणत असतील तर काय भविष्य असेल? तसंच सांगतो. आपल्या वाहतुकीवरून आपल्या देशाचं भवितव्य दिसतं. आकार उकारच नाही. कुठेही गाड्या पार्क केल्या जातात. आपल्याकडे फक्त पुल बांधले जातात. परत दोन वर्षात कामे निघावीत म्हणून रस्ते बांधले जातात, असा संतापही राज ठाकरे यांनी यांनी व्यक्त केला.

लोक गाडीतच राहतील

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सिग्नल न तोडण्याच्या सूचना दिल्या. कितीही घाई असेल तरी सिग्नल तोडायचा नाही, असं आवाहन त्यांनी केलं. एखाद्या दिवशी लोक घरातून निघतली, आणि गाडीतच राहतील, अशी आपल्या शहरांची भीषण परिस्थिती आहे. आपल्याकडे चांगली मैदानं नाही, चांगले गार्डन नाही. हे प्रश्न आपण आपल्यापासून सोडवले पाहिजे, असं ते म्हणाले.

Follow Us
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....