AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारण

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतच बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियन संघावरही टीकेची झोड उठली होती. असं असताना ट्रेव्हिस हेडने नेमकं काय झालं ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारणImage Credit source: PTI
| Updated on: Mar 03, 2026 | 6:03 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. या स्पर्धेतील साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साखळी फेरीत श्रीलंका आणि झिम्बाब्वेने पराभवाची धूळ चारली आणि सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ प्रबळ दावेदारांपैकी एक गणला जात होता. पण साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींनी संघावर टीकास्त्र सोडलं. ऑस्ट्रेलियन संघाला टी20 फॉर्मेटचं काहीच पडलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच काय रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्गज क्रिकेटपटूनेही ऑस्ट्रेलियन संघाचे वाभाडे काढले. असं असताना या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर ट्रेव्हिस हेडने आपलं मत मांडलं आहे. तसेच चाहत्यांनी असा विचार चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. या स्पर्धेत संघ विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करत होता असं सांगितलं.

ट्रेव्हिस हेडने नुकताच एडिलेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हेडने सांगितलं की, खेळाडू आणि संघाचा दृष्टीकोन प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के होता. असा कोणता फॉर्मेट त्यापेक्षा मोठा आहे असं नाही. तुम्ही वर्ल्डकप खेळत असतो तेव्हा काही वेगळा विचार करतो असं नाही. शक्य तितके सर्वोत्तम नियोजन करतो. मला वाटते की बहुतेक लोकांना असं वाटतं की टी20 क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो. ऑस्ट्रेलिया संघाला या स्पर्धेत पुढे न गेल्याचं दु:ख आहे. जेव्हा संघ पराभूत होतो तेव्हा बहुतांश लोकं टीका करतात. आम्ही या वर्ल्डकपमध्ये चांगलं क्रिकेट खेळलो नाही. प्रत्येक खेळाडूकडे चांगली कामगिरी करण्याची संधी होती. पण असं काही झालं नाही. पण आम्ही संघ म्हणून पूर्णपणे वचनबद्ध होतो.

ट्रेव्हिस हेडने सांगितलं की, आयसीसी स्पर्धांमध्ये वेगळी आव्हानं असतात. पण ऑस्ट्रेलियाने काही चांगल्या संधी गमवल्या हे देखील खरं आहे. आम्ही याबाबत चर्चा केली आहे. वर्ल्डकप आणि स्पर्धांबाबत विचारविनिमय केला आहे. आम्ही अशी परिस्थिती हाताळण्यात सक्षम आहोत, आशा आहे की येणाऱ्या आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी करू.

Follow Us
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?
पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?
Rohit Pawar On MPSC Pepar Leak | पेपर फोडून अधिकारी पैसे खातात, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? रोहित पवारांचा MPSC व्यवस्थेवर संताप
डीजे बंदीवरून राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत
Sanjay Raut | डीजे बंदीवरून संजय राऊत आक्रमक! मुख्यमंत्री कुंपणावर बसून तमाशा पाहत आहेत म्हणत सरकारला घेरलं
आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया स
MPSC | आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचं अपयश! सुप्रिया सुळे MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आक्रमक
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?