AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं

PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं

| Updated on: Nov 20, 2026 | 5:32 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फिक्कीच्या वार्षिक सभेत उद्योजकांवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने कंपनी करात कपात, जीएसटी कमी करणे आणि १२ लाखांपर्यंत आयकर मर्यादा वाढवणे यासारख्या अनेक सवलती दिल्या, परंतु उद्योजकांनी नोकऱ्या दिल्या का किंवा कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील उद्योजकांशी संवाद साधताना त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना, पंतप्रधान मोदींनी नव्या नोकऱ्या आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा मुद्दा उपस्थित केला.

मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकारने उद्योगस्नेही वातावरणात सुधारणा करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. कंपनी कराचा दर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत खाली आणला. तसेच, अनेक उत्पादनांवरील जीएसटी कमी करण्यात आला आणि १२ लाखांपर्यंतच्या कमाईवर कोणताही आयकर नाही. या सर्व सवलती दिल्यानंतरही उद्योजकांनी नोकऱ्यांची संख्या वाढवली का किंवा कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली का, असा थेट सवाल मोदींनी केला.

ते पुढे म्हणाले की, “याचे तुम्हाला कौतुक नाही. प्रत्येक वेळी आर्थिक विकासाची जबाबदारी सरकारच्या खांद्यावर टाकणे अपेक्षित नाही.” मोदींनी उद्योजकांचे कान टोचताना, सरकारने केलेल्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना सामाजिक जबाबदारीची आठवण करून दिली. देशाच्या आर्थिक विकासात उद्योजकांनी सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

Published on: Nov 20, 2026 05:32 PM

Follow Us