Kolhapur Election Results 2026 LIVE : कोल्हापूरच्या प्रभाग 18 मध्ये कोणाचं असणार वर्चस्व ? वाचा सविस्तर निकाल
Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2026 LIVE Updates in Marathi : कोल्हापूर महानगरपालिक निवडणूक निकाल, प्रभाग क्रमांक 18 मध्ये कोणी गाजवलं वर्चस्व ? चुरशीच्या लढतीत कोणी मिळवला विजय ? निकाल अखेर समोर

संपूर्ण राज्याचं लक्ष महानगपालिकांच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलं असून उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली असून गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला होता. मात्र 2 दिवसांपूर्वी प्रचार थंडावला असून काल मोठ्या संख्येनं मतदान पार पडलं. करवीरवासीय मोठ्या उत्साहाने आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी घराबाहेर पडले होते. प्रभाग क्रमांक 18 मध्ये यंदा 4 नगरसेवक निवडून द्यायचे असून त्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलं.
किती आहेत मतदार ?
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
कोल्हापूरचा प्रभाग क्रमांक 18 हा तसा वर्दळीचा आणि गजबजलेला. 28364 इतकी लोकसंख्या असलेल्या या परिसरात 6877 अनुसूचित जातीचे मतदार असून अनुसूचित जमातीच्या मतदारांची संख्या 116 इतकी आहे. अंबाई डिफेन्स, पायमल वसाहत, सम्राट नगर, एस एस सी बोर्ड, सुभाष नगर, राजेंद्रनगर झोपडपट्टी साळोखे पार्क, राजेंद्रनगर हौसिंग सोसायटी, गणपत पाटील नगर, रामानंदनगर , श्री स्वामी समर्थ नगर, बळवंत नगर परिसर, शेंडा पार्क मेडीकल कॉलेज परिसर अशी या संपूर्ण विभागाची व्याप्ती आहे.
उत्तरेला शिवाजी विद्यापीठ पश्चिम गेट वरुटे हॉस्पिटल समोरील रस्त्याने सुरू होणारा हा भाग जवाहरनगर सोसायटी पश्चिम हद्दीपर्यंत पसरला आहे. तर पूर्वेला नायरा पेट्रोल पंपापुढील व नाला हद्दीपासून ते शिवाजी विद्यापीठ पश्चिम गेटपर्यंत हा भाग येतो. दक्षिणेला नायरा पेट्रोल पंपापुढील रि स नं 583 व नाला हद्दीपासुन पश्चिमेस रि स नं 592 चे दक्षिण मनपा हद्दीपर्यंत आहे. आणि पश्चिमेला जवाहरनगर सोसायटी हद्दीकडील पूर्वेकडील रस्त्याने ते पूर्वेस आर के नगर पाचगांव रस्त्यापर्यंत या प्रभागाची हद्दल आहे.
या प्रभागात यंदा 4 नगरसेवक निवडून द्यायचे असून जुन्याच उमेदवारांना निवडून देतात की नव्यांना महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळते, मतदारांचा कौल नेमका कोणाच्या पारड्या लागतो, ते संपूर्ण चित्र आज स्पष्ट होणार आहे. सविस्तर निकाल आता थोड्याच वेळात लागेल.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
