AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर

MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर

| Updated on: Oct 27, 2026 | 5:26 PM
Share

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आघाडीवर आहेत. त्यांनी यापूर्वी तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले असून, चौथ्यांदा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील पिछाडीवर आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीकाँग्रेस(अजित पवार गट)चे सतीश चव्हाण यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सतीश चव्हाण हे यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2008, 2014 आणि 2020 मध्ये त्यांनी विजय मिळवला होता आणि आता चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 18 वर्षांपासून ते पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

मतदारांशी असलेला त्यांचा थेट संपर्क त्यांना या निवडणुकीत फायद्याचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. या उलट, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे सध्या पिछाडीवर आहेत. तर, ठाकरे गटाकडून दिलीप घुगे या युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. मात्र, मतांच्या विभाजनाचा फायदा आणि सतीश चव्हाण यांच्या अनुभवाचा लाभ त्यांना होताना दिसत आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून सध्या किरण सरनाईक आघाडीवर आहेत. विधान परिषद निवडणुकांचे अंतिम निकाल लवकरच अपेक्षित आहेत.

Published on: Oct 27, 2026 05:26 PM

Follow Us