मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026
मालेगाव महानगरपालिकेची स्थापना 2003 साली झाली. ही महापालिका नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराचे नागरी आणि प्रशासकीय व्यवस्थापन पाहते. मालेगाव महानगरपालिकेत सध्या एकूण 84 नगरसेवक (Corporators) जागा आहेत, जे 21 प्रभागांमधून निवडले जातात. मालेगाव महापालिकेची मागील निवडणूक मे 2017 मध्ये पार पडली होती, त्यामुळे तिचा कार्यकाळ मे 2022 मध्येच संपलेला आहे. आता 15 जानेवारी 2026 रोजी या महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे, यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोठी बातमी! निकालापूर्वीच पेढे, कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष, राज्यातील बड्या महापालिकेत मोठा उलटफेर, विजयी पताका फडकवली
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता. आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, घडामोडींना वेग आला आहे.
- Reporter Manohar Shewale
- Updated on: Dec 31, 2025
- 3:35 pm
मालेगाव : शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
मालेगावमध्ये शिवसेनेचे माजी उपमहापौर निलेश आहेर यांच्यासह 6 उमेदवारांनी नामनिर्देशन फॉर्म दाखल केले. सेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर सेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शक्तीप्रदर्शन करत या उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 11:35 pm