मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप, शिंदेंकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव? घडामोडींना वेग
महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं यश मिळालं आहे, राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर दुसरीकडे एमआयएमने देखील मोठी मुसंडी मारली. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला राज्यात चांगलं यश मिळालं आहे. राज्यात शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांचा मोठा पक्ष ठरला आहे. तर सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. दरम्यान राज्यात आणखी एक असा पक्ष आहे, ज्याला महापालिका निवडणुकांमध्ये जबरदस्त यश मिळालं आहे, तो पक्ष म्हणजे एमआयएम, एमआयएमने महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांकडून एक प्रस्ताव आला होता, असा दावा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे.
नेमकं काय म्हणाले जलील?
मालेगाव सारख्या ठिकाणी आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत, तिथे महापौर करण्यासाठी, एकनाथ शिंदे साहेबांकडून स्थानिक नेत्यांना एक प्रस्ताव आला होता, आपण सोबत येऊ शकता का? असा हा प्रस्ताव होता. परंतु आमचे तिकडचे जे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी ठामपणे नकार देत आम्ही भाजपसोबत किंवा शिवसेना शिंदे गटासोबत जाणार नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं, असा दावा जलील यांनी केला आहे, जलील यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान पुढे बोलता जलील यांनी असं देखील म्हटलं आहे की, तीन ते चार महापालिका अशा आहेत, जिथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी वेळ पडली तर सर्व पक्ष एकत्र येऊ. पार्टीचे अध्यक्ष ओवेसी साहेबांनी स्पष्ट सांगितलय, सन्मानाने तुम्ही आमचा सपोर्ट मागत असाल तर नक्की त्याबाबत आम्ही पॉझिटिव्ह विचार करू, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं.
दरम्यान नोटा उधळण्यात आल्या होत्या, त्यावर देखील जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जल्लोषाचा कार्यक्रम होता, त्या ठिकाणी आमचे निवडून आलेले 33 नगरसेवक होते. त्या ठिकाणी एका गायकाला बोलण्यात आलं होतं, तिथे काही उत्साही लोकांनी पैसे उधळले आहेत, त्यामुळे मला असं नाही वाटत की यामध्ये इम्तियाज जलील यांनी काही मोठा क्रामई केला आहे, असंही यावेळी जलील यांनी म्हटलं आहे.
