MIM Winners List : मुंबई ते मालेगाव, पालिका निवडणुकीत MIM चा डंका, कुठे किती उमेदवार विजयी; वाचा संपूर्ण यादी!
राज्यातील एकूण 29 महापालिकांचा निकाल आता लागला आहे. अनेक ठिकाणी भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु आता एमआयएमने केले्लया कामगिरीची सगळीकडे चर्चा होत आहे.

MIM Total Seats Won In Municipal Corporation Elections : राज्यात 15 जानेवारी रोजी एकूण 29 महानगरपालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. आता या महापालिकांचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. बहुसंख्य महापलिकांत भाजपा हाच पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. मुंबईत तर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षाची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. पुण्यात भाजपाने मुसंडी मारली आहे. छत्रपती संभाजीनगरातही भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता राज्यात एमआयएम या पक्षाने मोठे यश मिळवले आहे. या पक्षाचे मालेगाव, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड यासाराख्या इतरही काही महापालिकांत नगरसेवक निवडून आले आहेत. यासह समाजवादी पक्षानेही काही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच आता या दोन्ही पक्षांचे राज्यात एकूण किती नगरसेवक निवडून आले आहेत? ते जाणून घेऊ या..
राज्यात एमआयएमचे किती नगरसेवक निवडून आले?
एमआयएमचे संपूर्ण राज्यात एकूण 74 उमेदवार निवडून आल आहेत. यामध्ये मुंबईत एमआयएमचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत. संभाजीनगरात एमआयएमचे 24 उमेदवार निवडून आले आहेत. अमरावतीत एमआयएमचे 6 जण निवडून आले आहेत. मालेगावत एमआयएमचा 20 जागांवर विजय झाला आहे. इथे हा पक्ष सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरू शकतो. नांदेड महापालिकेत एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. येथे एमआयएमचे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. धुळे महानगरपालिकेतही एमआयएमचा 8 जागांवर विजय झाला आहे. जालन्यात एमआयएमचा दोन जागांवर विजय झाला आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election Results 2026 : जालना महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता, थेट पंकजा मुंडे यांनी...
Jalgaon Municipal Election Results 2026 : जळगावात महापालिका निवडणुकीत 69 जागांसह महायुतीचा बोलबाला
Worli Ward 197 Election Result 2026 : आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिला मोठा झटका
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
पुणे महापालिका जिंकताच भाजपचा मोठा निर्णय; अजितदादांशी युती नाहीच?
Pune Election Result : काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला - मुरलीधर मोहोळ
समाजवादी पार्टीला किती जागा मिळाल्या?
समाजवादी पार्टीनेही काही ठिकाणी चांगली कामगिरी कली आहे. मालेगावत एमआयएमचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, एमआयएम पक्षाने मुस्लीमबहुल भागात आपले उमेदवार दिले होते. त्यांना अपेक्षित यश मिळाले आहे. मुंबईपासून ते मालेगाव, नांदेडपर्यंत या पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. या पक्षाची एकूण ताकद पाहता या पक्षाच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचे म्हटले जात आहे. आता आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या पक्षाची काय रणनिती असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
