AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 जीबी रॅम असलेला लावाचा 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

लावा हा 5जी फोन भारतातील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि 120 हर्ट्झ एमोलेड डिस्प्ले सारखी वैशिष्ट्ये आहेत. चला जाणून घेऊयात हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि त्यात कोणते फीचर्स आहेत.

12 जीबी रॅम असलेला लावाचा 5G फोन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Lava Bold 5GImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 14, 2026 | 11:18 PM
Share

15 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी लावा कंपनीने एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. लावा बोल्ड 2 5जीच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 500,000 पेक्षा जास्त AnTuTu स्कोअर असलेला मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर समाविष्ट आहे. शिवाय फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 6 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.

या फोनमध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे आणि हा फोन ब्लोटवेअर-मुक्त अनुभव देतो. या नवीनतम लावा स्मार्टफोनची किंमत किती आहे, तो कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि त्यात इतर कोणते वैशिष्ट्ये आहेत? चला जाणून घेऊयात.

लावा बोल्ड 2 5जी ची भारतातील किंमत

6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला नवीनतम लावा मोबाईल फोन 12 हजार 999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. या किंमतीत बँक ऑफर्सचा समावेश आहे, म्हणजेच बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला हा फोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.लावा फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध होईल. तुम्ही हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करू शकता. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि फेदर व्हाइट या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

स्पर्धेबाबत बॊलायचे झाले तर या किंमत रेंजमध्ये हा नवीन लावा फोन Motorola G57 Power 5G, Redmi Note 14 SE 5G, Poco M7 Plus 5G, Samsung Galaxy F06 5G आणि Vivo T4x 5G शी स्पर्धा करेल.

लावा बोल्ड 2 5जी स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: या नवीनतम फोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे.
  • चिपसेट: या हँडसेटमध्ये 2.6 GHz सह मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 प्रोसेसर देण्यात आलेला आहे.
  • कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 -मेगापिक्सेलचा एआय रियर सोनी कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल.
  • बॅटरी क्षमता: फोनला 33 वॅट जलद चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम: लावा ब्रँडचा हा नवीनतम फोन अँड्रॉइड 15 ओएसवर काम करतो.

Follow Us
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.