ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संसदीय गटाची महत्त्वाची बैठक आज 14 जून रोजी पार पडली. या बैठकीला पक्षाचे काही खासदार अनुपस्थित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. बैठक संपल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ऑपरेशन टायगरवरही त्यांनी भाष्य केले.

या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर उर्वरित 5 खासदारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते तेथूनच बैठकीत सहभागी झाले. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी असल्याने ते शिर्डीतून ऑनलाइन जोडले गेले. नागेश आष्टीकर आपल्या मुलाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. तसेच वाशीमचे खासदार संजय देशमुख हे मुलीच्या लग्नाच्या तयारीमुळे ऑनलाइन उपस्थित होते, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
Published on: Jun 14, 2026 03:46 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र