AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी, 8 हजारांमध्ये मिळतोय जबरदस्त मोबाईल

तुम्ही जर 8 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन मोबाईल फोन शोधत असाल, तर या किमतीच्या श्रेणीत पोकोचा पॉवरफुल बॅटरी असलेले फोन उपलब्ध आहेत. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

स्मार्टफोन खरेदी करायचाय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी, 8 हजारांमध्ये मिळतोय जबरदस्त मोबाईल
Poco C71Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Mar 14, 2026 | 11:21 AM
Share

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुमचे बजेट 8000 हजार रूपयांपेक्षा कमी असेल तर चिंता करू नका. तुम्ही या बजेट रेंजमध्ये पोकोचा उत्तम स्मार्टफोन खरेदी करू शकतात. ज्यामध्ये 5200mAh ची मोठी बॅटरी आहे. या फोनचे नाव Poco C71 आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत किती आहे आणि या डिव्हाइसमध्ये मोठ्या बॅटरीशिवाय इतर कोणते फीचर्स आहेत? ते जाणून घेऊयात.

पोको सी71 ची भारतातील किंमत

5200mAh बॅटरी असलेला हा बजेट स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7 हजार 799 रुपयांपासून सुरू होते. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 8 हजार 799 रुपये खर्च करावे लागतील. या किंमतीच्या रेंजमध्ये Poco चा हा फोन Realme Narzo 80 Lite 4G, Motorola g06 Power आणि Samsung Galaxy A07 LTE सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.

पोको सी71 स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: या पोको फोनमध्ये 6.88-इंचाचा एचडी+ रिझोल्यूशन स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ, पीक ब्राइटनेस 600 निट्स आणि 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आहे. फोन वेट टचला देखील सपोर्ट करतो, जो वापरकर्त्यांना ओल्या हातांनीही फोन ऑपरेट करण्याची परवानगी देतो असा दावा केला जातो.

चिपसेट: या हँडसेटमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप: फोनमध्ये मागील बाजूस 32-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असेल.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी एक पॉवरफुल 5200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटी: डिव्हाइसमध्ये 4G VoLTE, GPS, ड्युअल-बँड वाय-फाय, USB टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ आवृत्ती 5.2 आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. विशेष म्हणजे या मोबाईलची किंमत इतर फोनच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे हा फोन खरेदी करणं परवडू शकतं.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?