AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल

मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; ‘मातोश्री’वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल

| Updated on: Jun 14, 2026 | 12:12 PM
Share

आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला काही खासदार खासगी कामानिमित्त व्हर्च्युअली उपस्थिती असतील असा दावा थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केला. तर आता नवीन राजकीय घडामोडींमुळे उद्धव सेनेते अस्वस्थता पसरल्याची माहिती

आज उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला काही खासदार खासगी कामानिमित्त व्हर्च्युअली उपस्थिती असतील असा दावा थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केला. तर आता नवीन राजकीय घडामोडींमुळे उद्धव सेनेते अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉटरिचबेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यांचा फोन सकाळपासून लागत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते मातोश्रीवर होणाऱ्या आजच्या (१४ जून) बैठकीला उपस्थित असतील का? याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने त्यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगर लवकरच पुर्णत्वास जाईल असा दावा केला आहे. दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी तर आमच्याकडे सातत्याने इनकमिंग सुरू आहे, मातोश्रीवरील आजच्या बैठकीला कोण उपस्थित राहतं ते पाहा असा सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे या बैठकीवर ऑपरेशन टायगरचे सावट उभं ठाकलं आहे.

Published on: Jun 14, 2026 12:11 PM

Follow Us