आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो… भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. “आम्ही चिमटे काढत नाही, थेट हल्ले करतो,” असे वक्तव्य करत त्यांनी राजकीय वातावरण तापवले.

यावेळी त्यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचाही उल्लेख केला. “शरद पवार यांनी अनेक मोठे नेते निर्माण केले, पण अनेकांनी 15 मिनिटांत साथ सोडली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मंत्री केले, मात्र काही जण एका क्षणात दूर गेले. आता निष्ठेची व्याख्या बदलली पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. “या देशाचा पंतप्रधान डिग्री विसरतो, बायको विसरतो आणि पंडित नेहरू यांचे स्मरणही करत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
राम मंदिर आंदोलनात शिवसेना सहभागी होती, फक्त भाजप आणि संघ नव्हते, असे सांगत त्यांनी CBI केसचा उल्लेख केला. “चार्जशीटमध्ये माझे नाव आहे, पण 5 कोटी रुपयांच्या प्रकरणावर सरकार बोलत नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
Published on: Jun 13, 2026 07:02 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र