AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?

पाणी डोक्यावरून गेलंय… ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?

| Updated on: Jun 13, 2026 | 6:44 PM
Share

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून शिंदे सेनेत 7 खासदार प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत मंत्री भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला असून शिंदे सेनेत 7 खासदार प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 7 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले की, अंबादास दानवे यांना या घडामोडींची माहिती असू शकते.

जर खासदार शिंदे सेनेत येत असतील तर त्यांचे स्वागतच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. “कोण आमच्या बाजूला येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे,” असे गोगावले म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी खासदारांची तातडीची बैठक बोलावल्याबाबतही त्यांनी भाष्य केले. पक्षप्रमुख म्हणून बैठक घेणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सांगत केवळ बैठका घेऊन परिस्थिती बदलणार नाही, असेही ते म्हणाले.

“पाणी डोक्यावरून गेले आहे,” असे म्हणत येत्या काही दिवसांत खरी परिस्थिती समोर येईल, असा दावा त्यांनी केला.

Published on: Jun 13, 2026 06:44 PM

Follow Us