AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा

ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा

| Updated on: Jun 13, 2026 | 6:44 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावल्याची चर्चा रंगली आहे. 14 जून रोजी होणाऱ्या या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावल्याची चर्चा रंगली आहे. 14 जून रोजी होणाऱ्या या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी प्रतिक्रिया देत “ये डर अच्छा है… ही भीती असली पाहिजे,” असे वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन टायगर’बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा होती. यामध्ये नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार संजय पाटील यांच्या नावांची विशेष चर्चा झाली होती.

याचवेळी धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. याबाबत बोलताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “ओमराजे निंबाळकर बैठकीला का उपस्थित नव्हते, हे तेच सांगू शकतील. मात्र एखादा खासदार पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर राहणे ही गंभीर बाब आहे.”

यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत यांना पक्षात कोणी विचारत नाही. त्यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याचीही खात्री नाही. ते स्वतः काँग्रेसच्या वाटेवर आहेत,” असा दावा वाघमारे यांनी केला.

तसेच, शिवसेना (शिंदे गट) हा हिंदुत्ववादी विचारांचा पक्ष असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटावर काँग्रेससोबत जवळीक वाढवल्याचा आरोप केला. “आमचा पक्ष हिंदुत्वाच्या विचारांवर ठाम आहे, तर ठाकरे गटाने हिंदुत्वाची भूमिका सोडून काँग्रेससोबत सलगी केली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 13, 2026 06:44 PM

Follow Us