ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
आज (दि. 14 जून ) रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला काही खासदार खासगी कामानिमित्त व्हर्च्युअली उपस्थिती असतील असा दावा थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केला.
आज (दि. 14 जून ) रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीला काही खासदार खासगी कामानिमित्त व्हर्च्युअली उपस्थिती असतील असा दावा थोड्यावेळापूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी केला. तर आता नवीन राजकीय घडामोडींमुळे उद्धव सेनेते अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सकाळपासून नॉटरिचबेल असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही दिवसांपूर्वच एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेले नागेश आष्टीकर उपस्थित राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित राहत आहे. याबाबत आष्टीकरांनी tv9 मराठीच्या प्रतिनिधीशी सविस्तर संवाद साधला आहे. आष्टीकरांनी विधान परिषदेच्या पार्श्वभूमिवर बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं. इतकेच नाही तर पुढे त्यांनी मी व्हर्च्युअली हजर राहीन असं सांगितलं आहे.
Published on: Jun 14, 2026 01:12 PM
आता तरी सुषमाताईंना पक्षाने...सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय...
दिवसभर काम आणि अनेक दौरे केल्यानंतर... रोहित पवारांना नेमकं काय झालंय?
26 फेब्रुवारीच्या बैठकीत घडलं ते... निवडणूक आयोगाकडून NCP ला तातडीचे न
उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानं

