NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
जितेंद्र आव्हाड हे सकाळी शिवतीर्थ येथे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. मात्र या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणून पाहिले जात आहे.
Published on: Jun 14, 2026 03:35 PM
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग

