AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही आमच्या पार्टीत या, इकडे…मनोज जरांगे यांची रोहित पवारांना खुली ऑफर; आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?

रोहित पवार हे बळीराजासाठी आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. हा न्याय मिळावा यासाठी राज्यातील सगळा शेतकरी एकवटणार आहे. त्यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही, असे भाष्य यावेळी त्यांनी केले.

तुम्ही आमच्या पार्टीत या, इकडे...मनोज जरांगे यांची रोहित पवारांना खुली ऑफर; आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
manoj jarange patil and rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 14, 2026 | 6:11 PM
Share

Manoj Jarange Patil : शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी तसेच कर्जमाफीच्या जाचक अटी मागे घ्याव्यात अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. त्यांच्या आंदोनलस्थळी अनेक दिग्गज नेते जात असून त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत. मराठा आरक्षणसाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनीदेखील पंढरपुरातील आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी त्यांनी आपल्या खास भाषणशैलीत सरकारने रोहित पवार यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

राज्यातील सगळा शेतकरी एकवटणार आहे

रोहित पवार यांनी मनोज जरांगे यांना शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटी आणि आंदोलनाचे कारण याविषयी माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केले. रोहित पवार हे बळीराजासाठी आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. हा न्याय मिळावा यासाठी राज्यातील सगळा शेतकरी एकवटणार आहे. त्यात कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही, असे भाष्य यावेळी त्यांनी केले. तसेच शेतकरी वाचला तर आपण वाचणार आहे. शेतकरी वाचला नाही तर राज्य आणि देश कसा चालणार, असा सवालही त्यांनी केला.

तुम्ही आमच्या पार्टीत या…

पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी मिश्किल भाष्य करत रोहित पवार यांना आमच्या बाजूने यावे, असे आवाहन केले. रोहित पवार यांच्या आंदोलनला चांगला प्रतिसाद आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतीडकीने केलं तर रोहित पवार यांच्या आंदोलनाला राजकारण हेच म्हटले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या पार्टीत या, अशी मिश्कील टिप्पणी मनोज जरांगे यांनी केली. तसेच आमच्या पार्टीत खूप मचळा आहे. तुम्ही कुठेही बसू शकता, असे जरांगे म्हणाले. तसेच तुम्ही कोणतीही मागणी केली तरी कोणीच काही बोलू शकत नाही. पण तुमच्या पार्टीत आल्यावर प्रश्न सोडवणं खूप अवघड आहे. आमच्या पार्टीत आलं की खूप गर्दी होते. कोणतीही मागणी करता येते, असंही जरांगे म्हणाले.

आपणही त्यांना शेतकरी म्हणून…

तुमच्या पोटतिडकीला किती महत्त्व दिले जाईल माहिती नाही. आपण शेतकऱ्यांसाठी बसलो आहोत. आपण या आंदोलनात तरी ही शेतकऱ्यांची लढाई आहे, असं समजावं. आपण काही रोहित पवार यांच्या राजकारणासाठी आलेलो नाहीत. ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत. आपणही त्यांना शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नाही, असेही मत जरांगे यांनी व्यक्त केले.

Follow Us
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण