AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरुचं सिंह राशीमध्ये गोचर, 5 राशींचं नशीब फळफळणार, आजपासून अच्छे दिन सुरू

आज गुरु ग्रहाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढील तब्बल 87 दिवस गुरु सूर्याच्या याच राशीमध्ये गोचर करणार आहे. आतापर्यंत गुरु ग्रह चंद्राच्या कर्क राशीमध्ये गोचर करत होता. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार असं मानलं जातं की या गुरु गोचराचा प्रभाव हा बाराही राशींवर कोणत्या न कोणत्या प्रकारे पडणार आहे.

गुरुचं सिंह राशीमध्ये गोचर, 5 राशींचं नशीब फळफळणार, आजपासून अच्छे दिन सुरू
Jupiter TransitImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 6:02 PM
Share

आज गुरु ग्रहाने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. आता पुढील तब्बल 87 दिवस गुरु सूर्याच्या याच राशीमध्ये गोचर करणार आहे. आतापर्यंत गुरु ग्रह चंद्राच्या कर्क राशीमध्ये गोचर करत होता. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार असं मानलं जातं की या गुरु गोचराचा प्रभाव हा बाराही राशींवर कोणत्या न कोणत्या प्रकारे पडणार आहे. गुरुला भाग्य, ज्ञान, करिअर, आणि विवाह योगाचा कारक ग्रह मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाला धनाचा दाता म्हणून देखील ओळखलं जातं. आज गुरुने सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. आता जानेवारी महिन्यापर्यंत गुरु ग्रहाचा मुक्काम हा सिंह राशीमध्येच असणार आहे. या गुरु गोचराचा 5 राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

मेष – मेष राशींच्या जातकांना गुरुच्या या गोचरामुळे अनेक लाभ मिळणार आहेत. दाम्पत्य जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अकस्मात धनयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच करिअरमध्ये देखील येत्या काळात चांगल्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

कर्क – कर्क राशींच्या लोकांना देखील या गुरु गोचराचा मोठा फायदा होणार आहे. पुढील 87 दिवसांमध्ये कर्क राशींच्या लोकांना करिअरमध्ये एखादी मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच आर्थिक स्थिती देखील मजबूत होणार असून, या काळात कुटुंबाची देखील साथ लाभणार आहे.

सिंह रास – गुरुने सिंह राशीमध्ये गोचर केलं आहे. त्यामुळे आता पुढील 87 दिवस या राशींच्या लोकांचा आत्मविश्वास हा एका वेगळ्याच उंचीवर असणार आहे. करिअरमध्ये देखील आनंद वार्ता मिळणार आहे. खूप दिवसांपासून एखादं काम अडलेलं असेल तर ते देखील या काळात मार्गी लागण्याचे योग बनत आहेत. अकस्मात धनाचा योग आहे.

धनु रास – धनु राशीला देखील या गुरु गोचराचा मोठा सकारात्मक फायदा होणार आहे, आतापर्यंत या राशीचे लोक नोकरीमध्ये जो दबाव अनुभवत होते, ते आता हळुहळु कमी होत जाणार आहे. घरात आनंदाचं वातवरण असणार आहे. करिअमरमध्ये काही नवीन संधी मिळण्याची देखील शक्यता आहे.

कुंभ रास – या काळात कुंभ राशीची देखील मोठी लॉटरी लागणार आहे. तुमचे जर कुठे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला या काळात पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. गुरुचं गोचर फायद्याचं ठरणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा