November Rule Change : रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात हा सर्वात मोठा बदल, 1 नोव्हेंबरपासून लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार?
तुम्ही IRCTC अॅप किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर हा बदललेला नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. बदलण्यात आलेला हा नियम अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसंदर्भात आहे.

IRCTC New Rule : भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा कुठलाही प्रवास करायचा असेल तर त्या भागात तुम्हाला रेल्वेने जाता येतं. विशेष म्हणजे रेल्वेने केलेला प्रवास हा सर्वात सुरक्षित मानला जातो. म्हणूनच रेल्वेने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ही कोट्यवधी आहे. लोकांना प्रवास करणं सोपं आणि सोईचं व्हावं यासाठी रेल्वे विभागातर्फे नियमांमध्ये वेळोवेळी बदल केला जातो. सध्या असाच एक महत्त्वाचा नियम बदलण्यात आला आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबर रोजीपासून होणार आहे.
नेमका नियम काय बदलला?
मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही IRCTC अॅप किंवा आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर हा बदललेला नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. बदलण्यात आलेला हा नियम अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसंदर्भात आहे. बदललेल्या नियमानुसार आता प्रवाशांना 60 दिवसांअगोदरच तिकीट बुक करता येणार आहे. म्हणजेच आता अॅडव्हान्स ट्रेन तिकीट बुकिंगचा कालावधी कमी करण्यात आलाय. अगोदर हा कालावधी 120 दिवसांचा आहे.
17 ऑक्टोबर रोजी घेण्यात आला निर्णय
तुम्हाला तुमच्या प्रवासाचे तिकीट 120 दिवसांच्या अगोदरच बुक करता यायचे. आता ही मर्यादा 60 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. हाच नवा नियम 1 नोव्हेंबर 2026 रोजीपासून लागू होईल. हा नवा नियम अॅडव्हान्स ट्रेन तिकीट बुकिंगवरच लागू असेल. हा निर्णय 17 ऑक्टोबर रोजीच घेण्यात आला होता.
अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसोबतच भारतीय रेल्वे हायटेक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एआयची मदत घेऊन प्रवाशांना ट्रेनबाबत, ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या सिटबाबत माहिती दिली जातेय. कोणत्या स्टेशनवर तिकिटांची मागणी जास्त आहे, याची माहिती तुम्हाला आता एआयच्या मदतीने मिळू शकते. या माहितीच्या मदतीन तुम्ही तिकीट बुक करावे की नाही, हे ठरवू शकाल.
दरम्यान, अॅडव्हान्स तिकीट बुकिंगसंदर्भात घेण्यात आलेल्या नियमाचे काही लोक स्वागत करत आहेत, तर काही लोका नाराजी व्यक्त करतायत. हा नियम लक्षात घेऊनच आता तुम्हाला तुमचे तिकीट बुक करावे लागणार आहे.
