AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt : आता संजय दत्त संजय गुप्ता यांचं ‘ते’ अर्धवट स्वप्न पूर्ण करणार, दिग्दर्शकाच्या निधनानंतर हळहळला

बॉलिवूड दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने संजय दत्त पूर्ण खचून गेला आहे. संजय दत्तने आपल्या मित्रासाठी पोस्ट देखील केली आहे. मित्राची ती शेवटची अर्धवट राहिलेली इच्छा संजय दत्त पूर्ण करणार आहे.

Sanjay Dutt :  आता संजय दत्त संजय गुप्ता यांचं 'ते' अर्धवट स्वप्न पूर्ण करणार, दिग्दर्शकाच्या निधनानंतर हळहळला
sanjay dutt and sanjay guptaImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 5:55 PM
Share

बॉलिवूडमधून एक दुख:द बातमी समोर आली आहे. ‘ कांटे’, ‘ शूट आऊट अॅट लोखंडवाला’, आणि ‘काबिल’ यांसारख्या चित्रपटांचे ‘दिग्दर्शक संजय गुप्ता’ यांचं 30 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईत निधन झालं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. अभिनेता संजय दत्तलाही आपल्या जवळच्या मित्राला गमावल्याने मनाला चटका बसला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आपल्या अर्धवट राहिलेली इच्छा त्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

संजय दत्त आणि संजय गुप्ता यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्रीचे नाते होते.दोघांनी ‘आतिश’ , ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘जिंदा’ आणि ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे संजय दत्तला मित्राच्या जाण्याने धक्का बसला आहे.

संजय दत्त याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “गुप्त्स, माझ्या भावा. तू आता आमच्यात नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आपण एकमेकांसोबत खूप काही अनुभवले आहे, कितीतरी आठवणी निर्माण केल्या आहेत आणि मैत्रीची अनेक वर्षे एकत्र घालवली आहेत. तू माझ्यासाठी नेहमीच कुटुंबाचा एक भाग होतास आणि हे कधीही बदलणार नाही. तुझी खूप आठवण येईल—आपल्या गप्पांची आणि आपण एकत्र घालवलेल्या त्या सर्व क्षणांची. सर्वांचीच खूप आठवण येईल”, असे संजय दत्तने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

संजय दत्तने पुढे लिहिल आहे की, “आपण नुकतीच ‘कांटे २’ (Kaante 2) बद्दल चर्चा केली होती; त्याच्या कथेबद्दल बोललो होतो. तुझ्या स्मृतीप्रित्यर्थ, मी ‘कांटे २’ ला तुझे स्वप्न मानून ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तुझ्या या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी मी शक्य तितके सर्व काही करेन. माझे तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील. तुझ्याशिवाय आयुष्य आता पूर्वीसारखे वाटणार नाही, भावा. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो.” असे संजय दत्तने लिहिले आहे.

चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांच्याकडे एक कथा तयार होती. ज्याच्यावर ते काम करत होते. त्यांनी ती कथा मोठ्या पडद्यावर आणायची होती. संजय गुप्ता यांचा 2002 मध्ये आलेला लोकप्रिय चित्रपट ‘कांटे’ चा पुढचा सिक्वल बनवण्याच्या तयारीत होते. त्यानिमित्त त्यांना संजय दत्त सोबत काम करायचे होते. या कथेवर त्यांनी कामही करायला सुरूवात केली होती. त्यांची ड्रिम कॉस्टही तयार होती. अशी माहिती देत त्यांनी मे २०२६ मध्ये ‘द इनकॉन्ट्रोव्हर्सियल पॉडकास्ट’ (The Incontroversial Podcast) ला दिलेल्या मुलाखतीत, गुप्ता यांनी ‘कांटे २’ (Kaante 2) बाबतच्या आपल्या संकल्पनेवर भाष्य केले होते. पण त्यांच्या जाण्याने बॉलिवूडला धक्का बसला आहे.

मात्र हा चित्रपट अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. त्याचं चित्रीकरणं किंवा प्रदर्शनाची तारीखही समोर आलेली नाही. संजय दत्तने दिलेलं आश्वासन आणि संजय गुप्ता यांचं अपूर्ण स्वप्न यामुळे आता ‘कांटे 2’ ची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा