AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...

बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की… विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे…

| Updated on: Jun 14, 2026 | 2:40 PM
Share

राज्यभरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढतच चालले आहे. ही बाब संपूर्ण महाराष्ट्रासाठी चिंताजनक असून आजकालच्या जनमानसातील गुन्हेगारी वृत्तीचा मुद्दा समोर आणणारी आहे. अलीकडेच बीडमध्ये धक्कादायक घटना घडली. बीडमधील एका लहानशा गावात घडलेली ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बीडमधील ही महिला गर्भवती होती. दरम्यान, तिच्यात आणि तिच्या नवऱ्यामध्ये अनेक कारणांवरून खटके उडत असत. इतकेच नाही तर सासरच्या इतर मंडळींकडूनही महिलेला दहा लाखांच्या हुंड्यासाठी वारंवार मारहाण केली जात असे. काही दिवसांपूर्वीच महिलेला पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कळले आणि या प्रकाराला तिने विरोध केला. याचा विरोध करताच गर्भवती महिलेला सासरच्यांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी महिलेला अचानक भयंकर रक्तस्त्राव सुरू झाला आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचे बाळ गर्भातच दगावले. अखेर या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला अन् त्यांनी थेट कारवाई करत महिलेच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Published on: Jun 14, 2026 02:40 PM

Follow Us