Nanded Election Result : ठाकरेंना जबर धक्का, भोपळाही फोडता आला नाही, बड्या पालिकेच्या निकालाने खळबळ!
नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. येथे त्यांना एकाही जागेवर विजय मिळालेला नाही.

Nanded Municipal Corporation Election Result : सध्या राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. मुंबई, पुणे अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबईत आता महायुती आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. तर पुण्यातही भाजपाचाच महापौर होणार आहे. राज्यातील बहुसंख्य महापालिकांत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असतानाच आता नांदेड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या महापालिकेत भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरला असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खातंही उघडता आलेलं नाही.
नेमका निकाल काय?
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नांदेड महापालिकेत एकूण 81 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील एकूण 40 जागांवर भाजपाचा विजय झाला आहे. अजूनही भजपा पाच जागांवर आघाडीवर आहे. तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष सहा जागांवर आघाडीवर असून एका जागेवर विजय झाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकूण सात जागा मळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि आघाडी पक्षाचे उमेदवार 4 जण आघाडीवर असून 6 जणांचा विजय झाला आहे. येथे एमआयएम पक्षाचेही एकूण चार उमेदवार विजयी झाले आहेत.
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबईत भाजपा सर्वात मोठा पक्ष, मुंबई महापालिका भाजपाकडे...
Pune Nagarsevak Election Results 2026 : तानाजी सावंत यांना धक्का, थेट मुलाचाच...
Mumbai Ward 202, 203 Election Result 2026 : वार्ड क्रमांक 202, 203 चा निकाल काय?
Mumbai Ward 74, 46 Election Result 2026 : वार्ड क्रमांक 74 चा निकाल काय?
Pune Election Result 2026 : रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आघाडीवर की पिछाडीवर ?
Pune Election Result 2026 : भाजपा पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष....
भाजपाचा महापौर, चव्हाण यांनी गड राखला
दरम्यान, नांदेड महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी मोठी ताकद लावली होती. सभा, बैठका याचा त्यांनी धडका लावा होता. विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हाताशी धरून त्यांनी घरोघरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. ही निवडणूक म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई होती. आता निकाल स्पष्ट झाला असून येथे 81 पैकी 40 जागांवर भाजपाचे पदाधिकारी विजयी झाले आहेत. त्यामुळे इथे भाजपाचाच महापौर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेत हेमंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
