नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणूक 2026
नांदेड शहराच्या प्रशासनासाठी तसेच लोककल्याकारी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सन 1935 मध्ये नांदेड नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. त्यावेळेचे नगरपरिषदेचे क्षेत्रफळ केवळ 16.48 चौ.किमी. इतके होते. तेव्हाची शहरी लोकसंख्या 54,708 होती. सन 1991 च्या जणगणनेनुसार शहरालगतच्या वाघाळा ग्रामपंचायतीला नगराचा दर्जा देण्यात आला. वाघाळा नगरपालिकेत जवळपासची कौठा, रहीमपूर (बळिरामपूर), फत्तेजंगपुरी, असर्जन, असवदवन ही गावे समाविष्ट करण्यात आली. वाढते शहरीकरण आणि नांदेड व आसपासच्या गावांची वाढ लक्षात घेऊन नांदेड नगरपालिका आणि वाघाळा नगरपालिका यांचे एकत्रीकरण करून शासनाने 26 मार्च 1997 रोजी नांदेड वाघाळा महानगरपालिका स्थापन केली. या नवनिर्मिती नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे पहिले महापौर हे सुधाकर रामराव पांढरे हे होते. तसेच पहिले आयुक्त होण्याचा मान आनंद लिमये (आएएस) यांना मिळाला
Nanded : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुस्लिम बांधवांचा भाजप प्रवेश
खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थित अनेक मुस्लिम बांधवांचा भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद वाढणार असल्याचा विश्वास नेत्यांना आहे.
- sanjay patil
- Updated on: Dec 29, 2025
- 12:23 am