Sambhajinagar, Parabhani, Jalna, Latur, Nanded Election Results 2026 LIVE: मराठवाड्यातून कोण होणार आऊट? नवी एन्ट्री की जुनाच खेळ?; थोड्याच वेळात निकाल
संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर Election Results 2026 LIVE Counting in Marathi: आज मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या शहरांचा कारभार कोणाच्या ताब्यात जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्कामोर्तब होईल.

LIVE NEWS & UPDATES
-
Latur Municipal Election Results 2026 : लातूरमध्ये आक्रमक भाजपला काँग्रेस थोपवणार?
विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचा सामना रंगला. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपचे मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या करिष्म्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
Nanded Nagarsevak Election Results 2026: नांदेडमध्ये अशोक चव्हाण करिष्मा दाखवणार?
नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण हे करिष्मा दाखवणार की, आमदार प्रताप पाटील चिखलीकर गेम करणार याची चर्चा रंगली आहे. या महापालिकेत सर्वच पक्षांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपाटले आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीचा सामना रंगतदार झाला आहे.
-
-
Parabhani Municipal Election Results 2026 : परभणीचा निकाल कुणाच्या पारड्यात?
काँग्रेस नेते माजी आमदार सुरेश वरपूडकर हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली. येथे उद्धवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांच्याशी त्यांना सामना करावा लागला. परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्रित लढत असल्याने येथे चुरस आहे.
-
Jalna Municipal Corporation Election Results 2026: जालन्यात कोण मारणार बाजी?
जालना शहर महानगरपालिकेच्या 16 प्रभागातील 65 जागेसाठी थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे.सकाळी 10 वाजल्यापासून होणार मतमोजणीला सुरुवात होत आहे.पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जालन्यात कोण बाजी मारणार याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये होणार प्रमुख लढत, भाजप नेते रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाविकास आघाडी सोडता सर्वच पक्षांनी जालना महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता.
-
Chhatrapati Sambhajinagar Mahapalika Election Results : मराठवाड्याच्या राजधानीत कोण मारणार बाजी?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांनी भाजपचा गड लढवला तर मंत्री संजय शिरसाट यांनी शिंदेसेनाचा किल्ला लढवला. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव सेनेची खिंड लढवली. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम सुद्धा रणांगणात होते. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरली. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीमुळे कुणाचा गेम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
-
मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांमध्ये कोण बाजी मारणार याची सर्वत्रच उत्सुकता आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर महायुती मुसंडी मारणार की विरोधक वचपा काढणार याची चर्चा रंगली आहे. जालना ही नवीन महानगरपालिका यावेळी अस्तित्वात आली आहे. तर इतर चार महापालिकांमध्ये सत्ता समीकरणं बदलेली आहेत. या पाच महापालिकांमध्ये एकूण 281 जागांसाठी एकूण 1,715 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. एकूण 24,48,574 मतदार होते. मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीतील भाजप आणि शिंदे सेना हे एकमेकांविरोधात लढले. तर नांदेडमध्ये पण धुसफूस दिसली. लातूरमध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसले. तर परभणी ऐनवेळी वरपूडकरांनी दुसरीकडे धाव घेतल्याने येथील निवडणूक रंगतदार ठरली. आता या सर्व नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निकाल कुणाच्या बाजूने लागतो आणि मतदार राजा कुणाला कौल देतो हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
Published On - Jan 16,2026 6:25 AM
