छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक 2026
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका हा शिवसेनेचा गड मानल्या जातो. हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जातो. अनेक सामाजिक चळवळींचे शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी तयारी सुरू झाली आहे. शहरातील 29 प्रभागतील 115 जागांसाठी लढत होईल यातील 58 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर 57 जागा या खुल्या प्रवर्गासाठी आहेत. सर्वसाधारण महिलेसाठी 30 तर सर्वसाधारण पुरुष 30, ओबीसी महिला 16 तर ओबीसी पुरुष 15, अनुसूचित जातीत 11 पुरुष आणि तितक्याच महिला नगरसेवक असतील .
शरद पवार भाजपप्रणीत एनडीए मध्ये येऊ शकतात, राज्यातील मंत्र्याचं मोठं वक्तव्य
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी शक्यता आहे. त्यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील एका मंत्र्याने मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार भाजपप्रणीत एनडीएमध्ये येऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 26, 2025
- 1:03 pm