Chhatrapati Sambhajinagar: ठरलं एकदाचं! महापौर, उपमहापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात? 10 फेब्रुवारीला फैसला होणार
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Mayor: शहराच्या 23 व्या महापौर, उपमहापौर पदी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. येत्या 10 फेब्रुवारी रोजी याविषयीचा फैसला होणार आहे. 57 जागा जिंकून भाजप बहुमतात आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार हे निश्चित आहे.

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Mayor: छत्रपती संभाजीनगरचा 23 व्या महापौर, उपमहापौर कोण असेल याची जोरदार चर्चा सुरू आहे. या पदाची निवडणूक ही येत्या 10 फेब्रुवारी रोजी होईल. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निवडणुकीसंदर्भातील आदेश बुधवारी सकाळी काढले. या निवडणुकीसाठी महापालिकेत सर्व 115 नगरेसवकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी हे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे असतील. महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर लागलीच महापौर निवडणुकीसाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे पत्र पाठवले होते.
कोण होणार महापौर?
महापौर कोण होणार ही चर्चा असतानाच भाजपमधून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत सोडत प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. राजू वैद्य, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, अनिल मकरिये, विजय औताडे, अप्पासाहेब हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे, अनिल मकरिये यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. यातील कोणत्या दावेदाराच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याकडे शहरवासियांचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांनी त्यांचा गटनेता अजूनही निवडलेला नाही. विभागीय आयुक्तांकडे एकाही पक्षाने अद्याप गटाची नोंदणी सुद्धा केलेली नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात ही प्रक्रिया झटपट होण्याची शक्यता आहे. एमआयएम पक्षाला गटनेता आणि विरोधी पक्ष नेता निवडावा लागणार आहे. एमआयएमकडून कुणाचे नाव समोर येते याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर महापौर पदी कुणाला संधी देणार यावर खल सुरू असल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगर महापौर, उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे
महत्त्वाच्या तारखा व वेळा
4 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्जांचे वितरण
6 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत
10 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता निवडणुकीसाठी विशेष सभा
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिला जाणार
मतदान प्रक्रिया
मतदान हात वर करून (हस्तउठाव पद्धतीने) होणार
समान मते झाल्यास चिठ्ठीद्वारे निकाल
पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काम पाहणार
राजकीय घडामोडींना वेग
महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 57 नगरसेवक
भाजपला बहुमतासाठी एक मत कमी
भाजप–शिंदे शिवसेना युतीची शक्यता
शिंदे शिवसेनेकडे 13 नगरसेवक
एमआयएमकडे 33 नगरसेवक असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वाची
