ओबीसी समजानेही उपोषण सुरू केलं आहे. ओबीसींचे दोन नेते उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेते आज संभाजीनगरला जाऊन ओबीसी नेत्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मनेोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे.