AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhatrapati Sambhajinagar: 20 वर्षीय लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् पोलिसांनी पकडलं, घातपात की प्रेमप्रकरण?

Waluj Police: एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तिसगाव चौफुली येथे समोर आला. वाळूज पोलिसांनी एक रिक्षा थांबवल्यानंतर हा प्रकार समोर आला. सावत्र आई-वडील ताब्यात घेऊन वाळूज पोलीस कडून तपास करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: 20 वर्षीय लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् पोलिसांनी पकडलं, घातपात की प्रेमप्रकरण?
छत्रपती संभाजीनगरImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 20, 2026 | 11:16 AM
Share

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरजवळील तिसगाव चौफुली इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळल्याचे आणि तिला अंत्यसंस्कारासाठी गावी नेत असल्याची माहिती समोर आली. घरातील सामानासोबत एका रिक्षातून तरुणीचा मृतदेह संशयास्पदरित्या नेताना पोलिसांनी तो या चौफुलीवर पकडला. प्रेमसंबंधातून तरुणीने गळफास घेतल्याचा आणि तिला गावी नेत असल्याचा दावा तिच्या सावत्र आईने केला. प्रकरणात आई-वडील ताब्यात घेऊन वाळूज पोलीस कडून तपास करण्यात येत आहे.

काय आहे घटना?

काल एका रिक्षातून काही लोक घरातील साहित्यासह गावाकडे जात होते. मात्र, तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांनी या रिक्षातील हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी मग रिक्षा थांबवली. पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना काही घरगुती वापराचे सामान आढळले. पण गादी पाहिली असता त्यात कुणीतरी गुंडाळल्याचे त्यांना आढळून आले. त्यात 20 वर्षीय तरुणी गुंडाळलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसही हा प्रकार पाहून चक्रावून गेले. त्यांनी मग आई-वडिलांची झाडाझडती घेतली. तेव्हा अजून धक्कादायक बाबी समोर आल्या.

प्रेमसंबंधातून जीवन संपवले

पोलिसांनी आई-वडिलांकडे या प्रकाराबद्दल विचारणा केली. मुलीच्या सावत्र आईने त्यावेळी पोलिसांना सांगितले की, मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यातून तिने गळफास घेतला आणि जीवन संपवले. बदनामी टाळण्यासाठी आणि गावाकडे अत्यंसंस्कारासाठी तिचा मृतदेह गुपचूप नेत होतो. पण पोलिसांनी त्यांच्या दाव्याबाबत संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांची कसून चौकशी सुरू केली आहे.

आत्महत्या की घातपात?

हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपाताचा याचा तपास आता वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहेत. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि सावत्र आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वीस वर्षीय तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. पण सध्या तरी या घटनेवरून अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.  या मृत्यूचे कारण समोर आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...